दिवाळी

Sthitapradnya
मराठी मिडिअम
1 min readNov 5, 2010

--

माझा प्रथम प्रयत्न. चु.भू. दे.घे

प्रकाशाची झळाळी | आनंदाची रांगोळी |
मनोहर दिवाळी | वर्णू किती ||

दिव्यांची आरास | पणत्यांचा प्रकाश |
मनीचा उल्हास | वर्णू किती ||

लक्ष्मीचे स्तवन | भक्तीने पूजन |
अवस्था उन्मन | वर्णू किती ||

फटाक्यांच्या लहरी | आकाशाच्या अंतरी |
दैदिप्यमान नगरी | वर्णू किती ||

गोड नि तिखट | फराळाचे ताट |
चवींचा थाट | वर्णू किती ||

प्रकाशाचा सण | संस्कृतीचे भूषण |
प्रयत्नांती वर्णन | अशक्य ते ||

Originally published at harshalbhave.in on November 5, 2010.

--

--