सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो

मोरोपंताची केकावाली

Sthitapradnya
मराठी मिडिअम
2 min readJul 18, 2016

--

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो
सदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडो
वियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो

(meaning:मला निरंतर सत्संग लाभो सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो, मनाचा पापदोष झडून जावो, ऐहिक सुखोपभोगाचा सर्वस्वी वीट येवो.
साधुसंतांच्या कमलासारख्या निर्मळ व कोमल चरणांचा आसरा माझ्या मनाला मिळो, त्यांनी दूर ढकलिलें असतां हट्टानेंच त्यानें तेथें अडून राहावें आणि इतकें करूनही त्या सधुचरणांचा वियोग झालाच तर त्यानें (पोटभर) रडावें, (तरीपण) त्यानें तुमच्या चरित्रांच्या पवित्र कथेंत निहमी रंगून जावे.)

न निश्चय कधी ढळो उजन्विघ्नबाधा टळो
न चित्त भजनी चळो मतीस दुप्त मार्गे वळो
स्वतत्व हृदया कळो दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो दुरित आत्मबोधे जळो

(meaning:माझे मन कधीही डळमळीत न होवो. दुष्टांनीं केलेल्या विघ्नांचा उपद्रव दूर होवो. चित्त तुमच्या भजनांत निश्चळ राहो. साधूंनीं सांगितलेल्या मार्गाकडे अन्तःकरण लागो. हृदयाला आत्मज्ञान लाभो. खोटा अभिमान साफ नाहींसा होवो. एकदा स्वच्छ होऊन भक्तिमार्गाला लागलेले मन पुन्हा विषयलालसेने मलीन न होवो आणि खर्या आत्मज्ञानाने सर्व पापाचे भस्म होवो)

नजे प्रियस दोष ते प्रियस दोषही चांगले
स्वतोक पितरा रुचे जरी हि कर दमी रांगले
तुलाची धरी पोटीशी कशी तदा यशोदा बरे
जरी मळवीशी रजो मलीन काय तू अंबरे

(meaning:जे नावडत असेल ते नेहमीच आपल्या दृष्टीला सदोष दिसते. उलट जे आवडते असेल ते जरी सदोष असेल तरीहि चांगलेच वाटते. चिखलात जरी रांगले तरी आपले मूल आईबापांना आवडतेच. लहानपणी धुळीने अंग लडबडून घेऊन तुम्ही कपडे मळवीत असां तरी पण माता यशोदा तुम्हाला आपल्या पोटाशी कवटाळीत असेच की नाही)

पिता जरी विटे विटोन जननी कुपित्री विटे
दया मृतर सार्धधी नकुल क:जले त्या किटे
प्रसादपट झाकिती परीपरा गुरुचे थीटे
म्हणोनी म्हणती भले न ऋण जन्मदेचे फीटे

(meaning:बाप चरी करंट्या पोराला विटला तर विटो. परंतु आई मात्र कधीहि विटत नाही. कुळाच्या कीर्तीला काळ्या काजळीप्रमाणे लागलेल्या त्या करंट्या पोरामुळे दयामृताचा ओलावा जिच्या अंतरंगात निरंतर आहे अशी ती माउली कधीहि (रागाने किंवा तिरस्काराने) गढूळ होत नाही. इतर गुरूंचे कृपावस्त्र झाकते खरे पण ते एकंदरीत अपुरेच पडते. (आईचे कृपावस्त्र मात्र बाळाला भरपूर पुरेसे होते) याच कारणास्तव सज्जन म्हणतात की जन्मदात्या मावलीचे ऋण कधीही फिटत नसते)

कृतात्त कटका मल ध्वज जरा दिसो लागली
पुर:सर्गता स्वये झगडता तनु भागली
सहाय दुसरा नसे तुज विणे बळे आगळा
लहू जरी उताविळा स्वरी तो कापितो आगळा

(meaning:यमाच्या सैन्याचे पांढरे निशाणच असे म्हातारपण नजरेच्या टप्यात आले आहे. यमाच्या स्वारीच्या अघाडीचे योद्धेच अशा रोगाबरोबर दोन हात करता करता हा थकून गेला आहे. तुझ्याहून ज्याच्या आंगी अधिक सामर्थ्य आहे असा दुसरा साह्यकारी कोणीच दिसत नाही. मग आताही जर मी अधीर होऊ नको तर या माझ्या शत्रूने गर्दन छाटलीच याची वाट काय)

दया मृतघना अहो हरीवळा मयुराकडे
रडे शिशुतया सी घे कळवळोनी माता कडे
असा अतिथी धार्मिकस्तुतपदा कदा सापडे
पुन्हा जड भवारणवी उतरिता नदा सापडे

(meaning:हे दयामृताच्या मेघा हरे या मयूराकडे (मोरोपंत कवीकडे) प्रसाद करण्याच्या हेतूने वळा. जे मूल रडते त्याला त्याची आई मोठ्या कळवळ्याने उचलून कडेवर घेते. धर्मनिष्ठांनी ज्याच्या पावलांची स्तुति केली आहे अशा परमेश्वरा, असा याचक आपल्याला कोठे आढळेल. आपले दास पापभाराने कितीही जड झाले असेल तरी या संसारसागरांत त्यांना उचलून परतीरला लावणे तुम्हाला खास कठीण नाही.)

Originally published at qrora.

--

--