आपले पेटीएम खाते आता लवकरच जास्त फायद्यांसोबत!

भारतीय रिझर्व्ह बँक च्या निर्देशानुसार आपल्या पेटीएम खात्याला लवकरच पेटीएम पेमेंट बँक च्या वॉलेट खात्यामध्ये बदलले जाणार आहे.

One97 Communications प्रायव्हेट लिमिटेड, रिझर्व्ह बँक कडून मान्यता मिळाल्यावर आपल्या वॉलेट व्यवसायाला नव्याने समावेशित करत पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (PPBL) ला हस्तांतरित करेल. आतापर्यंत आपले paytm खाते One97 communications limited द्वारा जारी केले गेले होते. आता यानंतर paytm खाते एका नव्या भारतीय वंशाची कंपनी पेटीएम पेमेंट बँक द्वारे जारी होईल.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (PPBL) मध्ये पेटीएम चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांची 51 % भागीदारी आहे तसेच उर्वरित 49 % One97 Communications लिमिटेड जवळ आहेत. या भागीदारीमध्ये हे प्रत्यक्षरित्या जाहीर आहे कि पेटीएम पेमेंट बँक योग्य रीतीने भारतीयांद्वारा , भारतीयांसाठी बनवण्यात आलेली एक भारतीय कंपनी आहे.
 यासाठी आपल्याला काहीही करायचे नाही आणि आपल्या पेटीएम मध्ये कोणताही बदल होणार नाही. आपले अकाउंट जसेच्या तसे राहील. आपला बॅलेन्स किंवा लॉगिन काहीही बदलणार नाही. आता लवकरच ही नवी कंपनी paytm पेमेंट बँक आपल्याला नवीन सेवा जसे बचत खाते, चेक बुक, डेबिट कार्ड ही देऊ शकेल. सोबतच आपल्या बचत खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेवर बँकेप्रमाणे व्याज ही मिळेल.

तर आपले कुटुंबीय तसेच ओळखीच्या प्रत्येकाला त्वरित पेटीएम app डाउनलोड करून, त्यांचे पेटीएम अकाउंट उघडा!

आपले पेटीएम खाते, पेटीएम बँक तसेच त्याच्याशी संबंधित काही महत्वपूर्ण तथ्य
 सध्या पेटीएम वॉलेट खात्यातून कोणत्याही बँक खात्यामध्ये आपली जमा रक्कम ट्रान्सफर केल्यावर कोणताही शुल्क लागत नाही. 31 जानेवारी 2017 पर्यंत हे कायम राहील. 31 जानेवारी 2017 पर्यंत आपण आपली जमा रक्कम 0 % शुल्कावर कोणत्याही बँक खात्यामध्ये पाठवू शकता. 
 31 जानेवारी 2017 नंतरही, पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड ( PPBL ) सुरु झाल्यानंतर आपल्याला हवे तेव्हा आपण आपल्या पेटीएम वॉलेट खात्यामध्ये जमा असलेली रक्कम पेटीएम वॉलेट खात्यातून पेटीएम बँक खात्यामध्ये कोणत्याही शुल्काशिवाय ट्रान्सफर करू शकता.

आम्ही हे जाणतो कि याबाबत आपल्या मनामध्ये अनेक शंका, प्रश्न असू शकतात. या सर्व शंका दूर करण्यासाठी आम्ही यासंबंधी नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न

प्र: माझ्या सध्याच्या पेटीएम वॉलेट चे भविष्य काय आहे? / माझ्या सध्याच्या पेटीएम वॉलेट चे काय होईल? / माझ्या सध्याच्या पेटीएम वॉलेट खात्याचे काय होईल?
 ऊ : आपले पेटीएम वॉलेट खाते पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड ( PPBL ) मध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. या ट्रान्सफर च्या प्रकियेमध्ये आपल्या खात्याची भरणा मर्यादा प्रभावित होणार नाही. उदाहरणार्थ: पेटीएम वॉलेट चे के वाय सी ( KYC ) खाते पेटीएम पेमेंट बँक मध्ये ही के वाय सी (KYC ) च राहील.

प्र: माझ्या सध्याच्या पेटीएम वॉलेट चे भविष्य काय आहे? / माझ्या सध्याच्या पेटीएम वॉलेट चे काय होईल? / माझ्या सध्याच्या पेटीएम वॉलेट खात्याचे काय होईल?
 ऊ : आपले पेटीएम वॉलेट खाते पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड ( PPBL ) मध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. या ट्रान्सफर च्या प्रकियेमध्ये आपल्या खात्याची भरणा मर्यादा प्रभावित होणार नाही. उदाहरणार्थ: पेटीएम वॉलेट चे के वाय सी ( KYC ) खाते पेटीएम पेमेंट बँक मध्ये ही के वाय सी (KYC ) च राहील.

प्र: माझ्या पेटीएम वॉलेट मध्ये जमा असलेल्या रकमेचे काय होईल?
 ऊ : आपली पेटीएम वॉलेट मधील जमा रक्कम पूर्णतः सुरक्षित आहे ! आम्ही आश्वासन देतो की कोणत्याही परिस्थितिमध्ये आपल्या जमा रकमेचे नुकसान होणार नाही. 
 पेटीएम वॉलेट खात्यामधून पेटीएम बँक खात्यामध्ये ट्रान्सफर आपली स्पष्ट परवानगी किंवा सहमतीनंतरच होईल. याबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवा 
 ( i ) जर आपले पेटीएम वॉलेट खाते मागील 6 महिन्यांमध्ये कधीही वापरण्यात आलेले आहे तर आपले वॉलेट खाते, बँक खात्यामध्ये आपोआप रुपांतरित केले जाईल. जर आपण हे करू इच्छित नसाल तर कृपया आम्हाला care@paytm.com वर एक ईमेल पाठवा किंवा आमच्याशी वेबसाइट किंवा पेटीएम अॅप च्या माध्यमातून संपर्क करा. 
 ( i i ) जर आपले पेटीएम वॉलेट खाते मागील 6 महिन्यांमध्ये कधीही वापरण्यात आलेले नाही तसेच त्यामध्ये कोणतीही जमा रक्कम नाही तर त्याला आपल्या विनंतीविना बँक खात्यामध्ये रूपांतरित केले जाणार नाही. जर आपण असे करू इच्छित असाल तर कृपया आम्हाला care@paytm.com वर एक ईमेल पाठवा किंवा आमच्याशी वेबसाइट किंवा पेटीएम अॅप च्या माध्यमातून संपर्क करा.

प्र: तर मी असे समजू कि पेटीएम पेमेंट बँक मध्ये माझे खाते आपोआप उघडले जाईल? / पेटीएम पेमेंट बँक मध्ये माझे खाते आपोआप उघडले जाईल?
 ऊ : नाही ! हे फक्त कंपनीच्या मालकी हक्काचे कागदोपत्री एका नवीन ( भारतीय) कंपनीला हस्तांतरण आहे. बँक सुरु झाल्यानंतर आपल्याला एक स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी पर्याय दिला जाईल.

प्र: मी पेटीएम पेमेंट बँक वॉलेट खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकेन का?
 ऊ :हो ! आपण पेटीएम पेमेंट बँक वॉलेट मधून कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकाल.

प्र: पेटीएम पेमेंट बँक सुरु केल्यानंतर पेटीएम वॉलेट वापरण्यासाठी पेटीएम पेमेंट बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे का?
 ऊ : नाही! पेटीएम पेमेंट बँक सुरु झाल्यानंतरही आपण बँक खाते उघडल्याविना, आधीप्रमाणे पेटीएम वॉलेट वापरू शकता.

प्र: जर मला यामध्ये सहभागी व्हायचे नसेल तर? / जर मला हे मान्य नसेल तर?
 ऊ : जर आपण पेटीएम पेमेंट बँक च्या मालकी हक्कामध्ये पेटीएम वॉलेटचा वापर करू इच्छित नसाल तर कृपया आम्हाला care@paytm.com वर एक ईमेल पाठवा किंवा Paytm.com/care वर लॉगिन करून आम्हाला कळवा. जर आपल्या वॉलेट मध्ये कोणतीही जमा रक्कम आहे तर आपण त्याला एकाच वेळी कोणत्याही बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. असे करण्यासाठी आपल्या ईमेल मध्ये खात्यासंबंधी माहिती जसे: खातेदाराचे नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, IFSC कोड इत्यादि नक्की सांगा.

प्र: पेटीएम वॉलेट खाते बंद करते वेळी शिल्लक जमा रक्कम बँक मध्ये ट्रान्सफर केल्यावर कोणतेही शुल्क आकारले जाईल का?
 ऊ : नाही ! पेटीएम वॉलेट खाते बंद करते वेळी शिल्लक जमा रक्कम बँक मध्ये ट्रान्सफर केल्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

धन्यवाद !

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.