Herpes zoster or Nagin

नागीण

नागीण व्याधीचे अनेक रोगी मी येथे माझ्या केशव आयुर्वेद चिकित्सालयात पाहीले आहेत व बरे देखील केले आहेत. या व्याधीचे वैशिश्ट्य असे की हा व्याधी अत्यन्र्त अचानक येतो पण याचे मूळ शरीरात अनेक दिवस दबा धरुन बसलेले असते. आयुर्वेदाप्रमाणे याचे कारण पित्त दोष बिघडणे असते. सुरुवातीला अचानक कुठेतरी दुखु लागते तेव्हा नागीणीची अजिबात शन्का येत नाही व नन्तर एक प्रकारचा रेश येतो व त्याचे रुपान्तर फोडात होते. पुढे फोड पाणावतात व प्रचन्ड आग व दुखणे सुरु रहाते. एखाद्या विशिष्ट नसेवर त्यान्चा प्रसार असतो. क्वचित तापदेखिल असतो.रुग्ण सतत अस्वस्थ असतो ना बसु शकतो ना झोप लागते.अशा वेळी त्याला लगेच आयुर्वेदिक उपाय सुरु करण्याची गरज सते त्यामुळे त्याचे फोड लवकर सुकुन येतात व पुढचा त्रास कमी होतो. तरुण माणसात तर आम्ही अवघ्या ३, ५. ७ दिवसात देखिल रोग बरा केला आहे. यात बाह्य मलम, पोटात पावडर व पातळ औषधान्चा वापर केला जातो. त्याने गुण येतो.

असे असले तरी अनेक रुग्णांमधे पोस्ट हर्पेटिक नुरेल्जिआ हा त्रास असतो जो फोड सुकुन गेल्यावर बरेच दिवस चालु रहातो. यात आग व दुखणे असे दोन्ही असु शकते १\१ वर्ष असे दुखत असलेले रोगी आमचेकडे येतात व त्याना देखिल अतिशय चान्गला गुण येवुन दुखणे कमी होणे, प्रचन्ड असलेला थकवा एखाद्या भागाची ताकद कमी होणे, आग अशी अनेक लक्षणे आम्ही बरी केली आहेत व व्याधी पुर्ण बरा केला आहे.

यात नागीणीचा वेढा पडल्यावर म्रुत्यु येतो ही भीती अनेक रुग्णांना व नातेवाइकाना असते पण ते सत्य नाही. तशी भीती बाळगु नये मात्र तीव्र ताप आला असता मात्र लगेच रुग्णालयात न्यावे तो डोक्यात जाणे धोक्याचे असते.

नागीणीसाठी शत धौत घ्रुत नावाचे तुप मिळते ते बाहेरुन लावण्यास उत्तम; शिवाय दशान्ग लेप पाण्यात कालवुन लावला तरी चालतो. पोटातुन घेण्यास चन्द्रकला रस १ गोळी ३ वेळा त्रिफळा गुग्गुळ १ गोळी २ वेळा व सारीवाद्यासव ३ चमचे २ वेळा घ्यावे.मात्र वैद्यकिय सल्ला मात्र महत्वाचा

नागीणीत काही पथ्ये पाळणे गरजेचे असते. यात जुना गहू, साठे साळीचा भात, मूग, मसुर, चणा डाळ, तूरडाळ, मान्साचे सूप, गायीचे लोणी व तूप , मनुका, कारले, डाळीम्ब, आवळा खावा. कापूर चन्दन यान्चा लेप लावावा.तिखट, मसालेदार, तिळ, उडीद, दही, हिरवी मिरची, पावभाजी सारखे विदाही पदार्थ, लसुण, कुळीथ, खारावलेले पदार्थ, जड मान्स इत्यादी अजिबात खावु नये. मद्य, उन्हात फिरणे, सन्तापणे वर्ज्य समजावे.

एवढे साम्भाळले असता नागीणीस भिण्याचे कारण नाही. धन्यवाद.