आता किती मराठी शिक्षित लिंक्डइन, मिडीयम आणि गुगुल प्लस वापरकर्ते यांना याचा ग्रंथित आणि गर्भित अर्थ माहिती आहे माहित नाही आणि म्हणूनच या संबधी ही माहिती प्रदर्शित करत आहे.

आज ही पण माहिती जाणून घ्या.

आवडली तर आपल्या आवडत्या लोकांना पण पाठवा आणि त्यानाही याचा रसस्वाद घेऊन द्या.

मलाही ४ मे २०१७ पर्यंत याचा अर्थ कोणी विचारला असता तर स्पष्ट मला माहित नाही म्हणून मी सांगतिले असते.

कारण सोपे.

शाळेत कधी हा शब्द सरळ किंवा वाकडा आला नाही.

शाळा संपल्यावर महाविद्यालयात पण हा शब्द कोणत्याही मार्गाने पायात,हातात,डोक्यात,डोळ्यात,मनात आणि विचारात आला नाही.

व्यवसायिक जीवन सुरु केल्यावरही हा शब्दाने कधी कंबरेचा काटा मोडला नाही.

अर्थात अजाणतेपणी या शब्दाने प्रारंभिक जीवनात (हॉटेल दर्शन मध्ये काम करत असताआणि त्याच वेळी महाविद्यालयीन शिक्षण घेत असता)अनेकदाडोळ्यातून पाणी मात्रजोरदार काढले आहे.

हा!आता तुम्ही ओळखले असणार कृष्णावळम्हणजे काय ते?

कृष्णावळ अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द.

आजकाल कोणीही नाही वापरत. कृष्णावळ चा अर्थ कांदा.

कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.

आहे की नै गंमत. डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे.

वरील विवरण माझे व्यावसायिक ग्राहक (आणि आता वैचारिक मित्र)श्री.अतुल बिवलकरयांनी मला What’s Appमाध्यामातून पाठवले.

मी ते पुन्हा प्रदर्शित करत आहे.

आपला विनम्र व कृपाभिलाषी,

फडके सुबोधकुमार मंगला ~ नारायण

#आजन्मविद्यार्थी; #फडकेभारतातून

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.