आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगायला गम्मत आणि देवाला किंमत राहिली नसती.

किती उपयुक्तआणि अर्थपूर्ण विचार श्री.पु. ल. देशपांडे लिहून गेले.

आज रोजी (दिनांक १५ डिसेंबर २९१६) आपण १८० डिग्री मध्ये फक्त आपल्या सभोवती नजर फिरवली आणि आजूबाजूला प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक वस्तूचे, प्रत्येक परिस्थितीचे आभ्यास पूर्वक निरीक्षण केले तर वर नमूद केलेला विचार यांची प्रचिती प्रत्येक सूज्ञ नागरिकाला आल्याशिवाय राहणार नाही.

१. आज काही जण उद्याचा दिवस कसा घालवायचा याचा विचार करीत आहेत.

२. त्याच क्षणी आज करोडो भारतिय आपण उद्या जगणार च आहोत या तोऱ्यात प्रत्येकवस्तू,प्रत्येक संधी,प्रत्येक क्षण,प्रत्येक पैसा,प्रत्येक सेकंद,प्रत्येक नाते,इत्यादी वाया घालवत आहेत.

३. ज्यांना आजची आणि उद्याची फक्त चिंता आहे ते वरील सुविचारानुसार वाटचाल करत आहेत.

४. त्याच वेळेस आज ज्यांना जन्मापासून प्रत्येक वस्तू,प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक सुविधा न मागता आणि गरजेपेक्षा जास्त मिळाली त्यांचे वर्तन बघितले, निरीक्षण केले आणि अनुभवले तर वर नमूद केलेला सुविचार किती योग्य, उपयुक्त आणि किती अर्थपूर्ण आहे यांची याच देही आणि याच जन्मी प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.

५. ज्यांना सर्वच गोष्टी आणि सर्वच वस्तू गरजेपेक्षा जास्त मिळाल्या त्यांना स्वातंत्र ची किंमत नाही,देवाची किंमत नाही,धर्माची किंमत नाही,पैशाची किंमत नाही,वेळेची किंमत नाही,पालकांची किंमत नाही,नातेवाईकांची किंमत नाही,मित्रांची किंमत नाही,देशाची किंमत नाही,देशातील नागरिकांची किंमत नाही,कायद्याची किंमत नाही,समाजकारणाची किंमत नाही,माणुसकीची किंमत नाही,इत्यादी.

६. अगदी ज्वलंत उदाहरणे म्हणजे भारतातील सर्व राजकीय पक्षांचे नगर सेवक,आमदार,खासदार,मंत्री आणि शासनाच्या विविध संस्थानावर लायकी नसताना विराजमान झालेले अध्यक्ष

७. गर्भ श्रीमंताची नातवंड आणि मुले/मुली

८. आपल्या योग्यते पेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त पगार मिळवणारा नोकरवर्ग

९. आपल्या योग्यतेपेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त नफा मिळवणारे सर्व व्यावसायिक ~ यात खास करून खाद्य पदार्थ विक्री करणारे,सोने-चांदी व्यवसायिक,बांधकाम व्यवसायिक, पिढीजात मिळालेली फुकट शेतजमिन विकून श्रीमंत झालेले शेतकरी, माहिती तंत्रज्ञान व्यवसायात काम करणारे, कापड व्यवसायात काम करणारे, शेतमाल देशाबाहेर विक्री करणारे, शेतमाल प्रचंड निर्माण करून या देशात विकणारे, भेसळीचा धंदा करणारे, इलेक्ट्रॉनिक वस्तू देशाबाहेरून आणून या देशात विक्री करणारे, सहकार उद्योगाचे प्रवर्तक, भारतिय मनोरंजन व्यवसायात अचानक नभुतोनभविष्यती यश संपादन करणारे, क्रिकेट व्यवसाय (हा खेळ आता राहिलाच नाही) यात काम करणारे, भ्रष्टाचार हा व्यवसाय करणारे, लोकांची लूट हा व्यवसाय करणारे करणारे, औषध व्यवसायात काम करणारे सर्व, इत्यादी.

यातील दरी एवढी मोठी आहे की या देशाला विकसित म्हणायचे का अविकसित हा यक्ष प्रश्न मनात निर्माण होतो.
आज नोटाबंदी प्रकरणात बँकेत जमा झालेले पैसे, घरपट्टी विभागाला मिळालेले पैसे, पाणीपट्टी विभागाला मिळालेले पैसे, वीज कंपनीला बिलापोटी मिळालेले पैसे, धाडीत मिळालेल्या नवीन नोटा, इत्यादी कशाचे दर्शन घडवतात?
या देशातील नागरिकांना काय संदेश मिळतो?
या देशाला गरीब म्हणायचे का गर्भश्रीमंत?
विकसित का अविकसित?

आभार,

फडके

Show your support

Clapping shows how much you appreciated S N Phadke’s story.