आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये. आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते. चुकतो तो फक्त चिन्हांचा वापर.

बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ही चिन्हें योग्य पद्धतीने वापरली कि उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले कि उत्तर मना-जोगते येते. मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक,मित्र 
आप्तेष्ट यांना हातचा समजू नये.

त्यांना कंसात घ्यावे. कंस सोडविण्याची हातोटी असली कि गणित कधीच चुकत नाही.

आपल्याला शाळेत त्रिकोण, चौकोन, लघुकोन, काटकोन, विशालकोन, इत्यादी सर्व शिकवतात. पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो. तो कधीच शिकवला जात नाही. तो म्हणजे “ दृष्टीकोन”.

आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण ‘सुख दुःखाचे’ accounts कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की ‘ आठवण’ सोडून काहीच balance उरत नाही.

शिक, शिकलेल पुन्हा विसरा आणि तोच विषय नव्याने शिका. नवा दृष्टिकोन लावून शिका.

Learn, Unlearn, Relearn till you become unbiased.

वरील उत्साहवर्धक लेख Whats App द्वारा माझे चलत काका श्री. माधव कर्वे यांनी पाठवला। मला लेख उपयुक्त आणि अर्थपूर्ण वाटला म्हणून पुन्हा प्रदर्शित करत आहे. मी याचा लेखक नाही.

आपला विनम्र व् कृपाभिलाषी 
फड़के सु. मं. ना.

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.