नमस्कार,

मला स्वताला म्हणी आणि सुविचार वाचणे आणि दैनदिन जीवनात त्याचा सुयोग्यपणे वापर करणे (खास करून माझे एखाद्या विषयासंबंधी चे विचार दुसऱ्यांना पटवून सांगणे) म्हणजे एक अवर्णनीय अनुभव. मी तो अनुभव रोज घेत असतो.

त्या करता मी रोज कमीत कमी १०० किंवा त्याही पेक्षा अधिक पाने याचे नित्य वाचन करतो.

वाचनाची वेळ ही सकाळी ४.३० ते ८.३० इतकी राखून ठेवली आहे.

वाचन करत असताना जी एकाग्रता आणि जो एकांतपणा लागतो तो याच वेळेत मला मिळतो.

असेच काही सुरस चमत्कारिक म्हणी काल वाचनात आल्या.

येथे सादर करीत आहे.

लेखिकेचे नाव पण त्यात नमूद केले आहे.

यांचा उपयोग व्यवहारात खुबीने करू शकाल याबद्दल मला शंका नाही.

आपण वाचन करून पडताळून बघा.

त्याचे आकलन होते की नाही हे ही बघा.

ह्याचे अनुभव आपल्याला आले का हे तपासून बघा.

आपला विनम्र आणि कृपाभिलाषी,

फडके सु.मं.ना.

#PhadkeFromIndia; #StudentForever

वाचाल तर वाचाल =लोकमान्य टिळक

बक्कळ वाचन करा =पु.ल.देशपांडे

श्रमदान हेच सर्व श्रेष्ठ दान = बाबा आमटे

पडेल ते काम = सौ. मंगला फडके

नाचता येईना अंगण वाकडे

इकडे आड तिकडे विहार

अपेक्षा करू नका अपेक्षाभंग होणार नाही =गोंदवलेकरमहाराज

सतत नामस्मरण करा म्हणजे जगाचा उहापोह करण्यासाठी वेळच मिळणार नाही

पायतान घालायची लायकी नाही आणि बापाला म्हणे होंडा सिटी घ्या

एक वाक्य बोलताना बोम्बाबोम्बआणि म्हणे मला आयफोन द्या

आड्यात नाही तर पोरयात कुठून येणार

काखेत कळसा गावाला वळसा

माकड म्हणते माझाच xxxx लाल

आमची अवस्था म्हणजे एक चड्डी दांडीला आणि दुसरी xxxxxxला

लाथ मारीन तिथे पाणी काढीन

गाढवाला गुळाची चव काय

कोल्हयाला द्राक्ष आंबट

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

शिता वरून भाताची परीक्षा

अगअग म्हशी मला कुठे नेशी

सापाला कितीही दुध पाजले तरी साप डंख मारल्याशिवाय रहात नाही

भीती पोटी ब्रम्ह राक्षस

चोराच्या उलट्या बोंबला

कंबरेच वस्त्र सांभाळता नाकेनाऊआणि म्हणे माझ लग्न करून द्या

Show your support

Clapping shows how much you appreciated S N Phadke’s story.