विरोधाभास

⁠⁠⁠⁠
१) आपण मुलीच्या लग्नासाठी जितका खर्च करतो तितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही. 
२) आपल्या देशात पोलिसाला पाहिल्यावर आपल्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता आणि तिरस्कार निर्माण होतो. 
3) आपण भारतीय खूप लाजाळू आहोत. तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे. 
4) आपण भारतीय आपल्या मोबाईलवर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून त्यावर स्क्रीन गार्ड लावतो. परंतु गाडी चालवताना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत. 5) आपण भारतीय मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण मुलांना बलात्कार करू नये असे कधीच शिकवत नाही. 
6) आपल्या देशात अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात. 
7) आपल्या देशात पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते. पण बलात्कारीत मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही. 
8) आपले राजकारणी आमच्यात फुट पडतात आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात. 
9) इथे प्रत्येकजण घाईत असतो. परंतु वेळेत मात्र कुणीच पोचत नाही. 
१0) इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले जाते. परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.
11) गीता आणि कुराण यांच्या नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी ९९% लोकांनी ते काय आहे हे माहिती नसते. 
12) इथे चपला वातानुकुलीत दुकानात विकल्या जातात आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो. 
१३) आयुष्यातलं पाहिलं वस्त्र म्हणजे लंगोट. त्याला खिसा नसतो. शेवटचं वस्त्र म्हणजे गुंढाळलेले कफन त्याला पण खिसा नसतो. तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून घेण्यासाठी तडफडत असतात.
१४) भारतील काही व्यवसायिक मंदिरावर झेंडा लावण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावतात आणि तेच भारतीय आपल्या घरावर भारताचा झेंडा लावताना मात्र कंटाळा करतात. 
१५) भारतील अनेकजण कोट्यवधी रुपयांचे अन्न रोज हॉटेल मध्ये वाया घालवतात पण तीच भारतीय भुकेल्या माणसास जेवायला देताना तिरस्कार करतात. 
१६) अनेक भारतीय व्यवसायिक आपल्या मुलांच्या साखरपुडा आणि लग्नावर करोडो रुपयांची उधळण करतात आणि हीच व्यवसायिक आपल्या धंद्यात मात्र पायरेटेड software चा वापर बेलाशक करतात. 
१७) प्रत्येक भारतीय अनेक भारतीयांना जन्मापासून मरेस्तोर पहिल्या नावाने, आडनावाने, जातीने आणि धर्माने संबोधतात. पण तोच भारतीय मेला की त्याला मात्र बॉडी म्हणून संबोधतात आणि तेहि क्षणार्धात।
१८) अनेक भारतीय पालक आपल्या मुला किंवा मुलीला शाळेचा किंवा महाविद्यालयाच्या रोज गृहपाठ करायला सांगतात आणि टेक पालक आपल्या कोणत्याही कामाचा कधीही गृहपाठ करत नाहीत.
१९) अनेक भारतीय पालक आपल्या मुलाना लवकर झोपायला सांगतात व् स्वता मात्र रात्र भर टीव्ही बघत बसतात.
२०) प्रत्येक राजकीय पक्ष मतदाराना शासकीय शाळात शिका म्हणून सांगतात पण त्यांची मुले मात्र खाजगी शाळात किंवा परदेशी शाळात शिकायला पाठवतात. 
२१) अनेक भारतीय व्यावसायिक आपल्या व्यवसायाची जागा साफ ठेवतात. पण आपल्या व्यववसायाच्या आजूबाजूला मात्र पान, सुपारी, तम्बाखू आणि गुटखा खाऊन घाण करतात.

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.