#MeToo म्हणजे काय ?

काय आहे हे me too ? मला तर फक्त l love you नंतर me too बोलतात एवढच माहीत होते. पण १०-१५ दिवस झाले me too वेगळ्याच संदर्भात वापरले जातंय.

बॉलीवूड कलाकारांनी metoo चळवळ सुरू केली आहे. गेले १५ दिवस त्यावरच्या बातम्या, पेपर मधले लेख, social media वरच्या प्रतिक्रिया आणि whats app वरचे जोक्स हे खूपच viral झालंय.

खरं म्हटले तर मुलीचा जन्म झाल्यापासून तिच्या बाबतीत metoo सुरू होतं. शाळेत, रस्त्यावरून येता जाताना, कॉलेजमध्ये, नोकरी लागल्यानंतर ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये प्रवास करताना, रेल्वे प्लॅटफॉर्म वर, भाजी मार्केटमध्ये, कुठच्याही गर्दीच्या ठिकाणी तिला metoo चा सामना करावाच लागतो. त्याला पर्याय नाही. सगळेच पुरुष वाईट असतात असे माझे म्हणणे नाहीये, पण सगळे चांगले असतात असेही नाहीये. त्यासाठी तिची लढाई तिलाच लढावी लागते आणि खंबीर व्हावे लागते. आज कुठच्याही क्षेत्रात मुली मागे नाहीयेत, रिक्षा चालक पासून ते अंतराळात मुलींनी मजल मारलीये. सगळ्यांना थोड्या फार फरकाने ह्याचा सामना करावाच लागतो. मी खूप लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या की “बॉलीवूड मधे हे सगळे चालतच, त्यात काय एवढं!”. हे कोणी ठरवले ? आपणच ना. पण मला हे सगळे वाचून एवढेच वाटले की ह्यात चूक मुलींची पण आहे, जसे सगळे पुरुष वाईट नसतात तसेच सगळ्या मुली चांगल्या असतात असे पण नाही. काम मिळण्यासाठी आपण कुठच्या थरापर्यंत जायचे हे आपले आपण ठरवायला पाहिजे म्हणजे metoo ची वेळ येणार नाही. आणि हे असे स्वतःला अबला नारी म्हणवून घेऊन आणि इतरांची सहानुभूती मिळवून घेण्यापेक्षा, मी त्याच्या मुस्काटात मारली हे सांगा ना. “I am the strongest woman” असे सांगितल्यावर त्याच्यावर metoo च्या किती प्रतिक्रीया येतात हे बघायला काय हरकत आहे?

अमृता कुंटे (२४/१०/२०१८)