Yes… I am Beautiful (Marathi)

पूर्ण देशपांडे कुटुंबात मी एकटीच सावळी होते.कुठल्याही लग्नप्रसंगात किंवा family functions मधे मला बघून नातेवाईकांची… पहिली प्रतिक्रिया असायची… ‘अरे… तुम्ही सगळे गोरेपान… देखणे… मग ही कुणासारखी सावळी झाली…’ आणि या सगळ्या comments माझ्या समोरच… त्यामुळे बालपणापासून मनात कायम एक न्यूनगंड असायचा… आपण गोरं नाही… सुंदर नाही… ईतकंच काय… college मधे गेल्यावर सुद्धा स्वतः बद्दल दुय्यम भावना होती. कुठल्याही मुलाला आपण आवडूच शकत नाही (रंग आणि चष्मा…!!!) त्यामुळे प्रेम वगैरे प्रकार आपल्यासाठी नाहीच हा ठाम समज होता… माझे आई- बाबा व भाऊ यांना खूप राग यायचा माझ्या रंगावर कोणी comment केली की…बाबा मला समजवायचे.. बेटा..आपण लक्ष देऊ नये या लोकांकडे…त्यांना काही कळत नाही… पण मला कळायचं…माझं मन दुखवू नये म्हणून हे समजावताहेत…
लग्न ठरवताना पहिल्याच स्थळाकडून नकार आला… मुलगी हुशार आहे..smart आहे….(आता चष्म्या ऐवजी contat lens hote) पण सावळी आहे…आम्हाला गोरी सून हवी आहे..वाटायचं… रंगापुढे ईतर गुणांना काहीच किंमत नाही… माझ्या फारशा अपेक्षा नव्हत्याच..सुदैवाने एका मध्यमवर्गिय कुटुंबातील सुशिक्षित… सुसंस्कारीत… निर्व्यसनी व कर्तबगार मुलाने बाह्य रंगापेक्षा ईतर गुणांना महत्व देऊन मला पसंत केले… माझे engineering मधे पदव्युत्तर शिक्षण झाले होते… मला doctorate साठी व नंतर संपूर्ण career मधे प्रोत्साहित करून संसारात सर्वतोपरी मदत केली.
पण मला माझ्या ख-या ‘मी’ ची ओळख करून दिली माझ्या लेकाने… तो लहानपणापासूनच समजूतदार व matured आहे… त्याला त्याच्या teenage मधेच लक्षात आलं… की मी स्वतः ला खूपच दुय्यम समजते ईतर बायकांपेक्षा…केवळ रंगामुळे… त्याने मलाच माझी नव्याने ओळख करून दिली… ‘Mom.. you are not at all less than anyone… in fact you are more beautiful…’ आणि मग मला त्याने माझ्यातिल ब-याच qualities ची जाणीव करून दिली… वाटलं… खरंच… आपल्या एका न्यूनगंडापायी आपल्याजवळ हे एवढं सगळं आहे हे लक्षातच आलं नाही आपल्या… आयुष्यातली कित्ती वर्ष आपण अशीच घालवली… खूप confident आणि छान वाटायला लागलं… Yes…I am beautiful !! माझ्या लेकाला एक टाळी दिली… मी माझ्यावरच प्रेम करू लागले… बाबांनी काढलेली समजूत खोटी नव्हती हे पटले… मी सगळ्यां पेक्षा सुंदर होते..
परवा खूप वर्षांनी पुतण्याच्या लग्नात परत एक comment कानावर पडली…’मालतीबाईंच्या बाकी दोन सूना गो-या आहेत..हीच सावळी आहे…’ माझ्यातली लहान मुलगी परत खट्टू झाली…. पण काही क्षणंच… मी त्या comment कडे चक्क दुर्लक्ष केलं… कारण पुढली पण comment आज मला ऐकू आली…’ हो…पण हुशार आणि smart आहे…’ आणि मी परत आत्मविश्वासाने मिरवायला लागले…Now I know…Yes…I am Beautiful !!आणि लेकाला एक टाळी दिली…. बाप-लेक कौतुकाने माझ्याकडे बघत होते….