#झी मराठी च्या सिरिअल्स कित्ती पाणचट आहेत. हा तोच चॅनेल आहे ज्या वर एके काळी प्रपंच किंवा वादळवाट सारख्या मालिका लागायच्या.अनुबंध सारख्या सिरीयल मध्ये surrogate pregnancy सारखा विषय पण हाताळला आणि तुषार दळवी, सई ताम्हणकर सारख्या अक्टर्स नी सुंदर काम केली. अवंतिका सिरीयल मध्ये अफेयर असलेल्या नवऱ्या समोर लाचार नसलेली एक सशक्त स्त्री मृणाल देव ने उभी केली.संदीप कुलकर्णी आणि मृणाल देव आणि पल्लवी सुभाष यांनी गुंतता हृद्य हे मध्ये suspense ची पकड कायम ठेवली.असंभव मध्ये एक उत्सुकता हि ताणून ठेवली होती आणि एक एक character चा परफॉर्मन्स लक्षात राहण्या जोग होता.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वाला स्ट्रॉंग स्टोरी होती.मध्ये मध्ये असायच्याच कुंकू सारख्या पाणचट सिरीयल पण आता एक पण सिरीयल गुंतवून नाही ठेवत.

नवऱ्याची बायको मधली राधिका इतकी का बावळट असे वाटते. तिच्या पेक्षा शनाया बरी म्हणावे वाटते.त्या गुरुनाथ मध्ये तर अजिबात च अर्थ नाही . का बरे त्याच्या मागे दोघीनी जावे. या सिरिअल्स मधले कंपनी मधले सीन्स इतके खोटे वाटतात कि बास.( देव टूर्स म्हणून एक कंपनी दाखवलेली ‘का रे दुरावा ‘ मध्ये.या सिरीयल writer ने कधी टूर ऑफिस ना पाहता डायरेक्ट सीन्स लिहिलेत असे वाटते. आणि त्या जय आणि अदिती ला आयडिया दिली कि प्रोमोशन्स. नेहमी ऑफिस मध्ये यावर आम्ही जोक करायचो .) खरे तर राधिका ला स्ट्रॉंग दाखवता आले असते. पण तिला लोकांना थालीपीठ करून घालण्यात च समाधान आहे.बरेच वेळा मला शनाया वर भरवसा नाही असे dialogs तिचे collegue मारताना दिसतात. अरे का फक्त शनाया , गुरु ला बोलायची गरज आहे.कुठे ना कुठे पुरुष प्रधान संस्कृती ची फार मोट्ठी झलक या छोट्या सीन्स मध्ये दिसते.

गौरी आणि शिव बद्दल तर बोलायलाच नको.इतका मस्त टॉपिक होता . पण पार वाट लावली.गौरी ला डोकयावर पदर घेऊन पहिले कि पुढे सिरीयल नाही पाहवत.त्यात एकाची पण acting उल्लेखनीय नाही. गौरी चा चेहरा मक्ख.त्यांचा स्वित्झर्लंड बघून स्वित्झझर्लंड ला जायचे स्वप्न मी बदलले (दुसऱ्या कंट्री च्या शोधात आहे).ग्रामीण भागातल्या ज्या सिरिअल्स दाखवतात त्यांशी मी कनेक्ट नाही होऊ शकत म्हणून बघतच नाही.

नाही म्हणायला चूक भूल द्यावी घ्यावी त्यातल्या त्यात चांगली आहे. at लीस्ट सर्वांची acting ( प्रियदर्शन जाधव ची ओव्हर अकटिंग सोडली तर). त्यातली नानी मस्त acting करते. अगदी कामवाली कुसुम पासून सगळे छान काम करतात. सर्वात छान काम करते ती जुनी मालू. सुंदर expressions. ही प्राईम टाइम ला नसल्याने मध्ये मध्ये च बघितली जाते :(.

पण ओव्हरऑल जुन्या झी t.v. मालिकांचा टच गेलाय. जिंदगी वरच्या युक्रेन आणि ब्राझील आणि टर्की च्या फॅशन इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या किंवा स्वतःची कंपनी काढायची अम्बिशन असलेल्या मुली बघून आपण कधी फॉरवर्ड होणार वाटत राहते. या मालिका अशक्य चालतात म्हणजे घरोघरी लोकांना गौरी आणि राधिका चालणारेत का? सारखी चहा घेऊन येणारी सून च अजून पण ideal म्हणायची का….सभोवताली पहिले तर प्रगती झालीये. पण सिरिअल्स मध्ये ती कधी रिफ्लेक्ट होणार?

— -आरती

Show your support

Clapping shows how much you appreciated Arti Patil’s story.