वहान ची प्रेरणा आहे तो कारीगर जो गावा गावांमधून वसलाय , जो त्या भागाचा भौगोलिक रचनेचा अन तिथल्या असलेल्या संस्कृतीचा इतिहास सांगतोय आपल्या कलेतून , जो समर्थपणे त्याला पिढ्यानपिढ्या मिळालेल्या कलेचा वारसा जपतोय अन आत्मसात करतोय ती कला तीला अजून उलगडण्यासाठी , काळाच्या अखंड वर्तनात त्या कलेत सतत होणारे बदल त्याला माहितीयत असले बदल त्याने आत्मसात केलेत पण पारंपारिक अस्सलतेचा बाज सांभाळत अन कस हे त्याला ठाउकय कारण त्याला उमजलीय ती कला तो प्रेरणा आहे वहान ची …

तो जाणतो ती कारीगिरी ती कलाकारी सर्वांहून चांगली, त्याला ठाउक आहेत काळाच्या ओघात वेळोवेळी ह्यात झालेली स्थित्यंतर, त्यांच्यात ती कला अजून जिवंत आहे खरतर अस म्हणू कि त्यांनी ती कला त्यांच्यात जिवंत ठेवलीय. एखादा पारंगत चित्रकार ज्या सहजतेने कागदावर चित्र काढतो अगदी त्याच सहजतेने अन तल्लीनतेने कारीगर रेखाटतो चपलेची होणारी रचना त्या चामड्यावर .
 त्यांना माहितीय इतिहास त्यांचा भागाचा परंपरा अन संस्कृती, त्यांचा सहभाग आहे ह्या सगळ्या प्रक्रियेत. त्यांना अवगत आहे कला पूर्वापार चालत आलेली पिढ्यानपिढ्या त्यांच्यात समरस झालेली काळाच्या ओघात अनेक आवृत्तीतून झिरपलेली आणि ह्या अश्या अद्भुत मिश्रणातूनच घडते पारंपारिक अस्सल कारीगिरी जी वारसा असते तिथल्या संकृतीचा, तिथल्या इतिहासाचा आणि परंपरेचा . ती कारीगिरी दाखवत असते कलेचा दैदिप्यमान प्रवास .

त्या कलेला अस्सलतेच पुन्हा स्फुरण द्यायचय हि प्रेरणा आहे वहानची.

आपल्या अश्या अमुल्य कलेतून व्यक्त होणारे जिथे आज कुठेतरी आजचा दिवस कसा ढकलायचाय ह्या काळजीत अडगळीत पडलेत तिथे ह्याच्याच गोष्टी चोरून इतर मात्र मस्तावले हे चूक संपल पाहिजे हि वहान ची प्रेरणा आहे

कलेची अस्सलता अन परंपरेचा सार त्याची स्थित्यंतर ह्याचे ते कारीगर अन आपल्यासोबत सोहळे साजरे व्हायला हवेत हि आहे प्रेरणा वहान ची

त्या कारीगाराला ती समृद्धी तो मोबदला तो आदर मिळवून देन ज्याला तो पात्र आहे हि प्रेरणा आहे वहान ची

अनुभवुया अस्सल अन पारंपारिक कलाकृती

अनुभवुया सहभाग त्या भागाच्या संस्कृती , वारसा अन इतिहासामधला जेव्हा आपण वापरू ती ठेव जी ते कारागीर आपल्यासाठी बनवतील अन वहान आपल्यापर्यंत पोहोचवेल

ऐका त्या कारागीरांच्या गोष्टी त्यांच्याच कडून वहानसोबत

चला सहभगी होऊया काही तरी चांगल करण्यात , चला …