भारत देश हा एक विविधतेने नटलेला, विविध जाती धर्म समुदायाला घेवून चालणारा आणि धार्मिकतेला विशेष प्राधान्य़ देऊन जीवन कंठणारा देश आहे. तरी पण विश्वात तो एक मोठा लोकशाहीवादी देश म्हणून त्याची ओळख सर्वश्रूतच आहे. विशेषत: बुध्द़ भुमी म्हणून भारताची विशेष ओळख आहे. भारत हा एक संघ एक समातेने वाट चाल करणाऱ्या पैकी आहे हा देश विविध संप्रदायाने पंथाने,धर्माने खुपच समृध्द़शाली झाला आहे. आणि हा देश प्रगती प्रथावर नेण्याच काम आपण जर पाहिल तर सम्राट अशोक काळा पासून या देशाने तत्कालीन राज्य़कर्ते सुध्दा पाहिले आहे. या भारतात युगानुयुगे चालत आलेल्या परंपरा या देशाला खुपच दुरवर नेऊन ठेवतात हाही मोठा प्रश्ऩ आहे या संस्कृतीने युगानुयुगे फक्त़ विषमतेचे संवर्धन करुन एक समृद्ध अशी धार्मिक चळवळ केली आहे पुरातन काळापासून अद्ययापर्यत त्यामध्ये परिवर्तन होतांना आढळत नाही. आणि परिवर्तन झाले तरी म्हणाल असा त्या परिवर्तनाचा फारसा उपयोग झालेला नाही. Read More Article….https://www.gauravprakashan.com/2022/10/blog-post_5.html

--

--

जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून आणि अहोरात्र कष्ट उपसून ही सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना लिहिली.भारतीयासाठी ही एकप्रकारची अनमोल अशी देणगीच म्हणावे लागेल.Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/10/blog-post_05.html

जगभरातील विविध देशाच्या संविधाना पैकी भारतीय संविधान हे लोकशाही प्रधान असलेले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.विविध जाती,धर्म,पंथ बोलीभाषा आणि रूढी,प्रथा,परंपरा असलेल्या भारतासारख्या विशालकाय देशातील समस्त नागरिकांना एका धाग्यात गुंफण्याची किमया ही भारतीय संविधानाने करून दाखवीली आहे.सात दशकांचा कालावधी उलटूनही भारतीय संविधान अबाधित आहे. घटनाकारांची दूरदृष्टी यासाठी कारणीभूत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून आणि अहोरात्र कष्ट उपसून ही
सर्वसमावेशक अशी भारतीय राज्यघटना लिहिली.भारतीयासाठी ही एकप्रकारची अनमोल अशी देणगीच म्हणावे लागेल.Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/10/blog-post_05.html

--

--

पुजनीय बाबा, पुजनीय हे विशेषण तुमच्या विचारात बसणारे नाही व तुम्हाला आवडणारेही नाही याची आम्हाला पुरेपुर जाणीव आहे.परंतु ज्यांना पुजनीय म्हणावे आणि मानावे अशी माणसे सध्या शोधूनही सापडत नाही.त्यामुळे तुमच्या नावालाच ते विशेषण शोभून दिसते.क्षमा असावी.बाबा, विषय फार गंभीर आहे.म्हणून तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा झाली.कदाचित तुमच्या दृष्टीने ती एक दुर्लक्षित करण्याजोगी घटना असेल.परंतु ज्या माणसाने या महाराष्ट्राच्या मातीला वैचारिकदृष्ट्या सुपीक बनविण्यासाठी स्वतःच्या शरीराची माती केली, त्या गाडगेबाबांच्या संदर्भात ही संतापजनक घटना घडली म्हणून बोलत आहे. महाराष्ट्र ही संत विचारांची पवित्र भूमी म्हणून आम्ही नेहमी फुशारकी मारत असतो.परंतु या महाराष्ट्रातच संतविचारांना वेळोवेळी पायदळी तुडविण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहे.आताही तुमची समाजसेवी व समाजमान्य विचारांची *दशसूत्री* मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून काही कुत्सित व विकृत विचाराच्या लोकांनी निर्दयपणे उखडून टाकली आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन सुन्न झाले आहे.आम्हीसुध्दा तुमच्या विचारांचे रक्षण करण्यात कमी पडलो आहे.त्यामुळे आम्हाला माफ करा बाबा ! Read More Article…..https://www.gauravprakashan.com/2022/10/blog-post_01.html

पुजनीय बाबा,

पुजनीय हे विशेषण तुमच्या विचारात बसणारे नाही व तुम्हाला आवडणारेही नाही याची आम्हाला पुरेपुर जाणीव आहे.परंतु ज्यांना पुजनीय म्हणावे आणि मानावे अशी माणसे सध्या शोधूनही सापडत नाही.त्यामुळे तुमच्या नावालाच ते विशेषण शोभून दिसते.क्षमा असावी.बाबा, विषय फार गंभीर आहे.म्हणून तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा झाली.कदाचित तुमच्या दृष्टीने ती एक दुर्लक्षित करण्याजोगी घटना असेल.परंतु ज्या माणसाने या महाराष्ट्राच्या मातीला वैचारिकदृष्ट्या सुपीक बनविण्यासाठी स्वतःच्या शरीराची माती केली, त्या गाडगेबाबांच्या संदर्भात ही संतापजनक घटना घडली म्हणून बोलत आहे. महाराष्ट्र ही संत विचारांची पवित्र भूमी म्हणून आम्ही नेहमी फुशारकी मारत असतो.परंतु या महाराष्ट्रातच संतविचारांना वेळोवेळी पायदळी तुडविण्याचे घृणास्पद प्रकार घडत आहे.आताही तुमची समाजसेवी व समाजमान्य विचारांची *दशसूत्री* मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून काही कुत्सित व विकृत विचाराच्या लोकांनी निर्दयपणे उखडून टाकली आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन सुन्न झाले आहे.आम्हीसुध्दा तुमच्या विचारांचे रक्षण करण्यात कमी पडलो आहे.त्यामुळे आम्हाला माफ करा बाबा ! Read More Article…..https://www.gauravprakashan.com/2022/10/blog-post_01.html

--

--

उत्सव हे चांगल़्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावे, हा शुद्ध हेतू असतो. परंतु अलीकडे विचार लक्षात न घेता केवळ ट्रेंड म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात. कुणी विचारले, तर त्यामागचे कारणही सांगता येत नाही. त्यामुळे व्यक्तीचे हसे होतेच, परंतु धर्म संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाते. म्हणून एखाद्या गोष्टीचे अनुसरण करायचे असेल, तर आधी त्याची संपूर्ण माहिती करून घ्यावी आणि मगच त्यानुसार कृती करावी. Read More Article….https://www.gauravprakashan.com/2022/09/blog-post_55.html

अमरावती (प्रतिनिधी) : विद्यमान सत्ताधारी सरकारच्या वतीने जनतेच्या समस्या व अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीत वाढत्या महागाईमुळे जनसामान्यांना जीवनायपन करणे कठीण झाले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना व अंमलबजावणी सुद्धा राज्य शासनाने वतीने केली जात नाही. जनतेच्या करिता वाढती महागाई त्रासदायक ठरत असतांना सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहे. आदी बाबी लक्षात घेता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमरावती शहर व जिल्हा च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समीप महागाईच्या विरोधात ५० खोके — एकदम ओक्के आंदोलन करण्यात आले. Read More News…https://www.gauravprakashan.com/2022/09/blog-post_82.html

कवी यशवंत मनोहर यांनी मराठी कवितेच्या प्रांतात नव्या सृजनात्मक शब्दक्रियेने नवा मार्ग स्थापन केला आहे.आंबेडकरी तत्वज्ञानाच्या अग्नीफुलांचा सुगंध घेऊन बंडखोरवृत्तीने मराठी कवितेला नवे आत्मभान दिले आहे.उत्थानगुंफा कवितेतील अग्नीप्रलय,काव्यभीमायन मधला आंबेडकर क्रांतीचा उद्यघोष, मूर्तिभंजन मधील स्नेहभावगर्भ व सामाजिक आविष्कार आंबेडकरवादी कवितेला नव्या उंचीवर घेऊन जाणारा आहे.कवी यशवंत मनोहर यांचा चौथा कवितासंग्रह जीवनायन उच्चतम नवकृतीचा मुक्त झंझावात आहे.मुक्तछंदाच्या निर्मितीची धगधगती ज्वाला त्यांनी वाचकाला दिली आहे. जीवनायन कवितासंग्रहातील कविता छंदात्म, छांदस अभिव्यक्तीमुळे खिन्नतेचे, दुःखाचे,अपेक्षाभंगाचे, क्रोधाचे प्रक्षोभाचे विविध स्वर कवेत घेऊन त्यांवर तळपळत राहणारा एक आश्वासक गंभीर स्वर निनादत असल्याचा प्रत्यय येतो.ओजस्वी शब्दकळाच्या क्रियान्वयेतून तिमिराचा निषेध करते.उजेडाची नवीन लेणी खोदण्याची ताकत देते. Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/06/blog-post_225.html

राज्यातील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची भुरळ पडली आहे. एमबीबीएस नंतर आयुर्वेदालाच विद्यार्थ्यांची पसंती, तर होमिओपॅथीकडेही कल वाढत चालला आहे. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती. मात्र, आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. बारावीनंतर निट युजी परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी निट ची तयारी करत असतात. मात्र सर्वांनाच एमबीबीएस ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत एमबीबीएस नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदाने घेतली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.Read More Article…https://www.gauravprakashan.com/2022/06/blog-post_943.html