!!! दिवाळी !!!
 — — — — — — — — — — — — — 
रावणाला धाराशायी करुण,
प्रभु रामचंद्र अयोध्येला परतले
दीव्यांच्या उजलत्या ज्योतिनी,
प्रजेने राजाचे गुणगान गायले

पांडव पण वनवास संपवुन ,
मायभुमिला आले याच वेळी
बळीकडून त्रैलोक्य मिळवून,
विष्णु देवाने केली सुरु दिवाळी

भगवान कृष्णाची भार्या,
शुर सत्यभामा अशी
नरकासुराचा वध केला,
साजरी झाली नरक चतुर्दशी

दिवाळी सन हा सत्याच्या विजयाचा,
अंधार नाहीसा करुण प्रगतिपथ प्रशस्त करण्याचा
धन धान्य सुख समृधिचा,
मानसातली माणुसकी अन प्रेम जपण्याचा

करू प्रार्थना शेरावाली मातेला,
आशिर्वाद असुदे सर्व प्राणीमात्राला
सुखाची झगमगाहट अशीच राहुदे,
देवी लक्ष्मी चा निरंतर सहवास लाभुदे !!!
 — — — — — — — — — — — — — — 
!!!शुभ दीपावली !!!

गणेश गायकवाड