अॅँगस डीटन, नोबेल आणि भारतीयांची उंची

Wall Street Journal

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार नेहमीच जागतिक अर्थ-नीतीच्या सध्याच्या टप्प्याबद्दल चर्चा घडवून आणतो. या वर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जन्माने स्कॉटिश असणाऱ्या अॅँगस डीटन यांना प्रदान केला गेला. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९४५ला एडिनबर्ग इथं झाला. डीटन यांनी केंब्रीज विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. सध्या ते अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. डीटन हे त्यांच्या व्यक्तिगत क्रयशीलता आणि त्याचा एकूण सामाजिक स्तरावर होणारा परिणाम, दारिद्र्य उन्मूलन आणि आर्थिक विषमता याविषयीच्या त्यांच्या अभ्यासासाठी ओळखले जातात.

डीटन यांच्या कामाचं भारतीय परिप्रेक्षात विशेष महत्त्व आहे. पण दुर्दैवाने भारतीय माध्यमांनी त्यांच्या एकूण कामाबद्दल आणि त्यांना नोबेल मिळाल्याच्या निमित्ताने घडू शकणारऱ्या अर्थनीतीविषयक चर्चेकडे सपशेल दुर्लक्ष केलं. अॅँगस हे अनेक वर्षांपासून स्टॅटिस्टिक्स (संख्यशस्त्र)चा अभ्यास करत आहेत. त्यांना, प्रत्येक व्यक्ति जेव्हा त्याचे पैसे खर्च करतो, तेव्हा त्याच्या खर्चाचा प्रधन्यक्रम काय असतो? तो कुठ्ल्या वस्तुवर किती पैसे खर्च करतो? आणि अशा वैयक्तिक उपभोग निर्णयांचा, एकुण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, यविषयी त्यांनी संख्याशास्त्राचा आरखडा उभा करुन दिला. या आरखड्यसाठीच त्यांना नोबेल दिला गेला आहे. या अभ्यासपद्धतीचा वपर करुन, एखद्या देशातील, विशेषत: विकसनशील राष्ट्रांमधे, दरिद्र्याचं नक्की परिमाण ठरवून, त्यावर सटीक उपाय शोधणं शक्य होऊ शकेल.

भारत आणि चिन मधली सरासरी लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कुपोषित आहे व बाल्यावस्थेत गरजेची असणरी पोषणमुल्यं त्यांना मिळत नाहीत. या निष्कर्षाचे राजकीय, भूसांस्कृतीक, ऐतिहासिक असे अनेक पैलु व अर्थ निघू शकतात. त्यामुळे भरतीय परिप्रेक्षात त्यांचं काम महत्त्वाचं ठरतं.

डीटन यांच्या आजवरच्या अभ्यसातला आणखी एक महत्त्वाचा आणि लक्षवेधक मुद्दा म्हणजे त्यांनी आशियाई वंशाच्या शारीरिक रचनेचं केलेलं विवेचन. याबाबत त्यांचे पंतप्रधान मोदींच्या निती आयोगात सदस्य असलेल्या अरविंद पनागरिया यांच्याशी मतभेद झाले. त्यांच्या मते, आशियाई, विशेषत: भारतीय आणि चिनी लोकांची सरासरी उंची ही इतर देशांच्या तुलनेने कमी असणं हे पनागरिया म्हणतात त्यानुसार वांशिक नसून, आहारतील पोषणमुल्यच्या कमतरतेमुळे आहे. हा त्यांचा प्रतिवाद ग्राह्य धरला तर त्याचा असा अर्थ होतो, की भारत आणि चिन मधली सरासरी लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कुपोषित आहे व बाल्यावस्थेत गरजेची असणरी पोषणमुल्यं त्यांना मिळत नाहीत. या निष्कर्षाचे राजकीय, भूसांस्कृतीक, ऐतिहासिक असे अनेक पैलु व अर्थ निघू शकतात. त्यामुळे भरतीय परिप्रेक्षात त्यांचं काम महत्त्वाचं ठरतं.

पण ते इथंच थांबत नाहीत. ते असंही म्हणतात की भारत आणि चीन या दोन्ही देशांनी दारिद्र्य निर्मुलन, बालमृत्यू दर आटोक्यात आणनं आणि एकुण पोषणमुल्यत वाढ करणं यात उत्तम कामगिरी केली आहे. १९५० मध्ये १००० बालकांमागे भारतात १६५ दगावत आणि चीन मध्ये १२२. साल २००५-१० पर्यंत भारतात ५३ आणि चीन मध्ये २२ असा होता. त्यामुळे चीनच्या तुलनेत भारताने याबाबत चांगली कामगिरी केली असं म्हणता येईल. दरिद्र्य कमी झल्यचं आणखी एक लक्षण म्हणजे भारतीय आणि चीनी नागरिकांची वाढत असलेली सरासरी उंची. चीनी लोकांमध्ये उंची वाढण्यचा दर १ से.मी प्रती दशक असा आहे आणि भारतीयांचा ०.५ से.मी प्रती दशक(ही एका दशकातील पीढ्यांची सरसरी आहे, एकाच पिढीचा वढीचा दर नव्हे) असं ते अभ्यसांती नोंदवतात. एकुणच डीटन यांच्या अर्थशास्त्रातील कामगिरीचा अभ्यास व उपयोग भारतीय विश्लेश्क, माध्यमं, जनता आणि राज्यकर्ते करुन घेऊ शकले, तर नक्कीच भारताला समस्यांची कोंडी फ़ोडायला मदत होईल.

  • प्रथमेश पाटील
One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.