माणसं

माणूस हा प्राणी समजायला खूपच अवघड आहे. माणसची व्याख्या करणे तर त्याहूनही अवघड. विचार करणारा प्राणी… की अविचार करणारा प्राणी? दोन पायाचा प्राणी… अशी गणिती व्याख्या करुन चालनार नाही. शेक्सपीयरनं माणसाच्या दोन जाती केल्या होत्या. चांगली माणसं अन वाईट माणसं. चांगल्या माणासांचा शेवट चांगला तर वाईट माणसांचा शेवट वाईट असं त्याच्या नाटकातून दिसतं. पण आता तसंही सांगता येणार नाही. काही चांगली माणसं काही लोकांशी वाईट वागतात तर काही वाईट माणसं काही लोकांशी चांगली वागतात. एकच माणूस दुसऱ्याशी चांगलं तर तिसऱ्याशी वाईट वागू शकतो. थोडक्यात माणसं ओळखण अवघड.

माणासांचे काही ठोकताळे आहेत. संतापी माणसं प्रेमळ असतात. जास्त बडबड करणारी माणसं धोकदायक असतात. तोंडावर गोड गोड बोलणारी माणसं फसवी असतात. आपण मात्र माणसं ओळखायला चुकतो किंबहुना आपली स्तुती करणारी माणसं आपल्याला आवडतात. खरं तर ही अशी माणसं धोकादायक प्रसंगी स्पष्ट बोलणारी, कटू बोलणारी माणसं आपल्याला आवडात नसली तरीही ती धोकदायक नसू शकतात. किंबहुना अशी माणसंच तुम्हाला तुमची जागा दाखावतात. तुम्हाला जामिनीवर ठेवतात. आपल्यातले दोष समजले नाहीत तर आपल्यात सुधरणा होणार नाही.

माणसं माणसांवर प्रेम करतात. जीवन सुसह्य करतात. माणसं माणसांचा द्वेष करतात. एकमेकांचं वाईट चिंततात. जातपातीवरनं दंगली करणारी माणसंच, एकमेकांना मारणारी माणसंच. माणसां विषयी लिहितांना एका इंग्रजी लेखकानं म्हटलंय की, जसजसा मी माणसांत मिसळू लागलो तसं तशी मला कुत्री आवडू लागली. एखाद्या कुत्र्याच्या मनात काय आहे हे त्याच्या हालचालीवरुन समजतं, शेपटी हालवली तर त्याला आपल्यविषयी प्रेम वाटतंय, गरगुरला तर रागवलाय असं समजतं. माणसंच तसं नाही. माणूस गोड बोलला तरी त्याची भीती वाटते. त्याचं गोड बोलण्या मागचं कारण समजत नाही. अर्थात ह्याचा अर्थ सगळी गोड बोलणारी माणसं धोकादायक नसतात. काही ‘आपली’ माणसं असतात. काही आपली वाटणारी माणसं परकी असतात. काही परकी वाटणारी माणसं आपली असतात. असं हे सारं विचित्र गणित आहे. काही माणसं माणसासारखी वागत नाहीत म्हणूनच बहिणाबाई म्हणून गेल्या `मानसा मानसा कधी होशील तू मानूस?`

मला तर वाटतं माणूस हा प्रेम करणारा प्राणी आहे. माणूस निसर्गावर प्रेम करतो, तो माणसांवर प्रेम करतो, प्राण्यांवर प्रेम करतो. मात्र त्याचा अपेक्षाभंग झाल्यावर तो उदासतो. त्याच प्रेमाचं रूपांतर द्वेषात होतं, रागात होत. कधी कधी तर ते इतका परकोटीला जातं की प्रेयसीचा खून करणारा देखील माणूसच असतो.

माणसांन माणूसपण टिकवायला हवं. आठ-दहा वर्षाच्या बालकचा खून करताना माणसांच हृदय निर्दय बनू शकतं? म्हातार्या माणसाचा गळा दाबताना माणसाचे हात थरथरत नाहीत? पुत्राच्या, धनाच्या लोभापायी माणसं या थरापर्यंत जाऊ शकतात. माणसं अविचारी बनतायत का? संतापाच्या वेळी दहा आकडे मोजणे आम्हाला का जमत नाही? संत कबीरांनी संदेश दिला होता, ‘विवेकाला गुरु माना… आम्ही सारे विसरू लागलोय. युद्ध, दंगली ह्यात माणूस नष्ट झाला अन कोट्यावधी वर्षानंतर एखादा प्राणी जगला तर तो सांगेल हया पृथ्वीवर माणूस नावाचा दुष्ट प्राणी होऊन गेला…’ तशी ओळख राहू द्यायची नसेल तर माणसानं माणसासारखंच वागायला हवं.

Like what you read? Give Sadanand Bhanage a round of applause.

From a quick cheer to a standing ovation, clap to show how much you enjoyed this story.