एमपीएससी मंत्र : मानव संसाधन विकास अभ्यासक्रमाचे विश्लेषण

भारतातील मानव संसाधन विकास अभ्यास –

# तथ्यात्मक अभ्यास – भारतातील लोकसंख्येची सद्य:स्थिती – संख्यात्मक स्वरूप (आकारमान आणि वाढ – िलग, वय, नागरी आणि ग्रामीण) आणि गुणात्मक स्वरूप (शिक्षण व आरोग्यविषयक), बेरोजगारीचे स्वरूप आणि प्रकार, सेवायोजनाचा कल, विभिन्न विभागांतील व क्षेत्रातील कुशल कामगारांचे मागणी दर.

# संकल्पनात्मक अभ्यास – आधुनिक समाजातील मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व आणि गरज, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत घटक आणि कारणीभूत गोष्टी, मानव संसाधन विकासाशी संबंधित समस्या आणि बाबी, भारतातील बेरोजगारीची समस्या.

# पारंपरिक अभ्यास – मनुष्यबळ विकासाकरिता कार्यरत असलेल्या शासकीय आणि स्वयंसेवी संघटना उदा. एनसीईआरटी, एनआयईपीए, विद्यापीठ अनुदान आयोग, मुक्त विद्यापीठे, एआयसीटीई, एनसीटीई, आयटीआय, एनसीव्हीटी, आयएमसी इत्यादी. लोकसंख्याविषयक धोरण आणि २०५० पर्यंतच्या योजना, शासनाचे नोकरीविषयक धोरण, बेरोजगारी आणि न्यून बेरोजगारी कमी करण्यासाठी योजना.

# शिक्षण –
> संकल्पनात्मक अभ्यास – मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील शिक्षण प्रणाली (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण), मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्टय़ा व आíथकदृष्टय़ा गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य, कौशल्य शोध इत्यादी, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी समस्या आणि प्रश्न, ई-अध्ययन, जागतिकीकरण आणि खासगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम.

>पारंपरिक अभ्यास – राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी. अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम.

# व्यावसायिक शिक्षण –

>संकल्पनात्मक अभ्यास – मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न.

>तथ्यात्मक अभ्यास – व्यावसायिक / तंत्र शिक्षण – भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सद्य:स्थिती.

> पारंपरिक अभ्यास – शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था. शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम.

# आरोग्य –
> संकल्पनात्मक अभ्यास – मानव संसाधन विकासाचा अत्यावश्यक आणि प्रमुख घटक म्हणून आरोग्याचा विचार, जीवनविषयक आकडेवारी, भारतामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यावर मात करण्यासाठीचे प्रयत्न.

>पारंपरिक अभ्यास – भारतामध्ये आरोग्यविषयक काळजी घेणारी यंत्रणा, शासनाची आरोग्यविषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, जननी – बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. जागतिक आरोग्य संघटना – उद्देश, रचना, काय्रे व कार्यक्रम.

# ग्रामीण विकास –
> संकल्पनात्मक अभ्यास – ग्रामपंचायत आणि ग्रामविकासातील पंचायत राज व्यवस्थेची भूमिका, पंचायत राज व्यवस्थेला अधिकार प्रदान करणे.

>तथ्यात्मक अभ्यास – ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण.

>पारंपरिक अभ्यास – जमीन सुधारणा व विकास, ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामविकासामध्ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

अभ्यास कमी वेळेत व चांगल्या प्रकारे व्हावा या दृष्टीने अभ्यासक्रमातील घटकांची अशी विभागणी केल्यास ती उपयोगी ठरेल. आपला अभ्यास परिणामकारकपणे होण्यासाठी वेगळ्या पद्धतीने त्याचे नियोजनही करता येईल. या विभाजनाचा उपयोग मुद्दे समजून घेण्यासाठी चांगल्या रीतीने होऊ शकतो. संकल्पना आणि मुद्दे नीट समजले की त्यांचे वेगवेगळे आयाम, त्यांचे उपयोजन या बाबी सोप्या होतात. विभाजित अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास कसा करावा याची चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात येईल.

One clap, two clap, three clap, forty?

By clapping more or less, you can signal to us which stories really stand out.