गोड बोलत शेतातील माळ्यावर नेऊन अल्पवयीन मुलीसोबत केले अशिल्ल चाळे.आरोपी विरोधात पोक्सो नुसार गुन्हा दाखल ....

श्रीगोंदा दिनांक ५ सप्टेंबर :
श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी या गावात शेती करून उदरनिर्वाह करणारे एक कुटुंब आहे .त्या कुटुंबात दोन अल्पवयीन मुली आहेत .त्यातील एका मुलीसोबत शेजारीच राहणाऱ्या नराधम व्यक्तीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी मुलीची आई आपल्या एका मुलीला घेऊन घराशेजारीच असलेल्या शेतात कामाला गेली .मुलीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरी एकटी असलेल्या मुलीला गोड गोड बोलून शेजारच्या एका वयस्कर इसमाने गैर फायदा उचलण्याच्या दृष्टीने त्या मुलीला शेतात बाजरी राखायला माळ्यावर जाऊ म्हणत तिला शेतात घेऊन गेला .शेतातील माळ्यावर नेऊन तिचे आंतरवस्त्र काढून तिला लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारे तिच्याशी वर्तन केले.हे करत असताना मुलीने माझ्या मम्मीला नाव सांगते म्हणत त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र , त्या इसमाने त्या लहान मुलीला तुझ्या घरच्यांना जीव मारील अशी धमकी दिली.आई घरी आल्यावर या पीडित मुलीने तिच्या सोबत झालेला प्रकार आईला सांगितला.दोन दिवसांनी घरी आलेल्या मुलीच्या वडिलांना त्या मुलीच्या आईने हा घडलेला प्रकार सांगितला .या सर्व घटनेनुसार पीडित मुलीच्या आईने व वडिलांनी त्या इसमाच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली .दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गु.र.नं.४३३/२०१८ ,भा.दं.वि.कलम ५०४ व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम व नियम २०१२ च्या कायद्यानुसार कलम ७ तशेच ८ प्रमाणे आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.पाटील साहेब करीत आहेत.
