बंद लिफाफा

मुलांनो, हे एक कोडे आहे. हे सोडविण्यासाठी तुम्हाला घरातील जुन्या पत्त्यांची खूप मदत होईल.१ ते १० अंक लिहिलेले १० पत्ते आपल्याला पुरेसे आहेत. इथे १० च्या पत्त्याला आपण ० समजुया.
अगदीच नाही सापडलेत तर कागदाच्या १० चिठ्ठ्या बनवून त्यावर ० ते ९ हे अंक लिहा.या कोड्यात…..
  • ५ बंद लिफाफे आहेत.
  • प्रत्येक लिफाफ्यात दोन दोन पत्ते आहेत.
  • ० ते ९ अंक लिहिलेले १० पत्ते या ५ लिफाफ्यात विभागले आहे
  • आत असलेल्या दोन अंकाची बेरीज त्या त्या लिफाफ्यावर लिहिली आहे….जसे..३, ७, ८, १३, १४.

मुलांनो, ओळखा बरे, कुठल्या लिफाफ्यात कुठले पत्ते आहेत ते!!

एकापेक्षा जास्त बरोबर उत्तर आहेत का?असल्यास, किती?
तुम्हाला एकच संधी आहे लिफाफा उघडण्याची…..तुम्ही कुठला लिफाफा उघडून बघाल?