परदेशातील होळी न्यारी

खेळतो विना पिचकारी

बर्फात खेळतो होळी आम्ही

बर्फात खेळतो होळी

सवड मिळेना कोणास कोठे

बेत आखले मनात मोठे

येत्या रविवारी करू पुरणपोळी

तेंव्हाच पेटवू होळी

हिमपाताने झाली मौज साऱ्यांची

कामास मिळाली सुट्टी

बर्फात खेळूया, मजा करूया

शाळेला ही बुट्टी

शेकोटीच्या उबेत बसुनी

राग लोभाची पेटविली होळी

लाकडाच्या प्रज्वलित ज्वाळेत केली

द्वेष मत्सराची राख रांगोळी

मुक्त आनंदाचे उधळून रंग

परतली मुलांची टोळी

घरी येउनी ताव मारती

तुपा सवे पुरणाची पोळी

कटाची आमटी, पोळी व पापड

डोळ्यावरती आली झापड

वाटे झोपेचीच घेतली गोळी

बर्फात खेळलो होळी आम्ही

बर्फात खेळलो होळी

हिवाळ्यातला पहिला हिमपात

थंडीची करितो खरी सुरवात

दृश्य जरी ते जुने ओळखीचे

आजही पाहुनी डोळे दिपतात

अलगद बर्फाचे थेंब थबकती

झाडांच्या उंच शिखारांवरती

आकाशातुनी भूवरी पडता

गवतावरती दमून निजती

दृश्य सारे बदलून जाते

सगळीकडेच श्वेत पसरते

वसुधा जणू थंडीत जपाया

कापसाची मऊसर शाल पांघरते

पायवाट व रस्त्यातील अंतर

होउनी जाई अगदीच धूसर

जपुनी चालती पथिक सारे

लक्ष पावलांकडे निरंतर

मुले आनंदुनी नाचती बागडती

हिमपऱ्यांची स्वप्ने बघती

जाऊ म्हणती राज्य कराया

सैन्य घेउनी हिमकिल्यांवरती

मोठ्यांना वाटे घरी बसावे

जागेवरुनी अजिबात न उठावे

ऊष्म पेय हातात घेउनी

शेकोटीसमोर मजेत बसावे

वसंत सरला, ग्रीष्म संपला

आता शरदाचे वैभव

हिरव्या गार झाडांत अवचित

लाल पिवळे पल्लव

पशू व पक्षी करू लागले

पूर्व तयारी गारठ्याची

वृक्षवल्लीही वेश बदलती

अद्भुत किमया निसर्गाची

बघता बघता रंग बदलले

छटा तयात अनेक

पीत केशरी लाल जांभळी
नटली धरा सुरेख

दोन्ही बाजूंस रस्त्यास वेढले

उंच रंगीत झाडांनी

वाटेतही गालिचा पसरला

पुष्परूपी पर्णांनी

रंग सारे उजळून निघती

सूर्याच्या लख्ख प्रकाशात

मुग्ध होउनी सारे बघती

जणू असू स्वर्गात

दोन दिसांचा असे सोहळा

घ्या डोळ्यात भरून

चुकल्यास मात्र वाट पहावी

एकच वर्ष अजून

Photo (c) 2014 Rajesh Abhyankar

आई या विषयावरती

कविता झाल्या अनेक

व्याक्ति वैशिष्ट्ये अनेक परंतु

माया तीच एक

आई आमची लहानपणी

अतीत साताऱ्यात वाढली

लग्न झाल्यावर तिचे थेट

दिल्लीस जाऊन पोचली

आई वडिलांस तिच्या

सोडूनि लांब आली

परप्रांतीय जागेत सुद्धा

मराठी संस्कृती जपली

वांग्याची भाजी भाकरी व

आमटीचा सुटे खाट

झुणका भाकर लसणाची चटणी

अस्सल मराठी पदार्थ जेवणात

एकटी असून सुद्धा

अनेक माणसे जोडली

तीन मुलांना सांभाळून

हिंदी बोलावयास शिकली

आम्हास शिवले नवीन कपडे

करुनि विणकाम, भरतकाम आणि शिवण

सासू बाईंच्या हाताखाली

स्वयंपाकातही झाली निपुण

मंडळातल्या स्पर्धेत बनविले

क्लिष्ट पदार्थ सुरेख

कौतुक साऱ्यांचे मिळवून

बक्षिसे मिळविली अनेक

शिस्त आम्हास लाविली

कष्टाने कर्तव्ये पाळण्याची

सत्कारणी लावावा दिवस, म्हणे ती

त्यानेच शांत झोप मिळे रात्रीची

संसार करावा काटकसरीने

प्रेम असावे निरपेक्ष

जोडीदाराची सेवा करुनी

दाखविले तिने प्रत्यक्ष

हिच्याच शिकवणींमुळे सासरी

कौतुक माझे झाले

कौशल्य सारे शिक्षकाचे

परि गूण शिष्यालाच मिळाले

बर्फाचे संचित ढीग वितळले

हरित कोवळे गवत पसरले

हिरव्या गवतामधे उमलले

फूल मनोहर तांबुस पिवळे

ऋतुचक्राचे पुढचे पाऊल

वसंतऋतुची लागे चाहूल

सूर्याची आली ऊब हवेत

जीवजंतूंना घेई कवेत

शुष्क वाळके वृक्ष बहरती

नव पल्लव जन्मास घालती

दुरावलेले कोकिल काक

परतले उबेची ऐकुनी हाक

प्राण्यांचे शावक झोपून उठती

अन्न शोधण्या दुडुदुडु पळती

लपलेल्या मधुमक्षिका भुंगे

वनी खेळती सुमनांसंगे

मुलेही उत्सुक मौज कराया

अभ्यास सोडुनी मुक्त पळाया

लहान मोठे म्हणती सारे

थंडीतुनि सुटका झाली पहारे

फळाफुलांनी खुलली धरणी

अजब असे देवाची करणी

Originally published at umarecipesmarathi.blogspot.com.

The infection of using a foul language embedded with a variety of curse words, is spreading like an epidemic, especially within the tween and the teen community. I call it ‘The Profanity Epidemic’.

The initial exposure usually occurs sometime between entering Middle school and entering High school. It begins with the symptoms of ears becoming accustomed to receiving some filthy words. …

photo credit — https://unsplash.com/alejandroescamilla

Over the past few decades, there has been a remarkable increase in the number of people living abroad. As a result the new generation is being fostered away from its motherland. While most people try to preserve and pass on their culture to their next generation, not enough efforts are being taken to teach and save our mother tongues. If it continues this way, all these beautiful languages will disappear from these households and will be at a risk of becoming extinct. …

सज्जन वृत्ती प्रामाणिकता

अद्भुत देशप्रेम

लिखाण वाचन अखण्ड चाले

तोचचि नित्य नेम

बालपणी जो हात धरुनि मज

लिहावयास शिकविले

त्या वडिलांवर काव्य कराया

आज मला की गमले

कुठे करू सुरवात कळेना

सांगू किती कुठपर्यंत

अवघे चित्रचि उभे ठाकले

आठवणी अनंत

भाषेपासुनी सुरवात करूया

त्यांना भाषा शिकाण्याचा नाद

म्हणती की भाषेमुळेच

घडे परस्पर संवाद

संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी

भाषांवर त्यांचे प्रभुत्व

सुरेख अक्षर अस्खलित वाणी

शुद्ध लेखनाचे महत्व

स्वयंपाक असो की संमार्जन वा

उसवल्या वस्त्राची शिवण

अडचणी आल्या असंख्य तरीही

स्वावलंबनाची शिकवण

काम कुठलेही अचूक करावे

असे आम्हास शिकविले

त्या वडिलांवर काव्य कराया

आज मला की गमले

शिकवणींची ही अमूल्य रत्ने

आम्हास देउनि थकले

तरीहि म्हणती तुम्हास द्यायला

मजकडे काहीच न उरले

कष्ट करुनी प्राप्त धनही

आम्हास घडविण्या वापरले

त्या वडिलांवर काव्य कराया

आज मला की गमले

Originally published at uma.kitchen on October 16, 2015.

परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर नवीन पिढी ही भारताबाहेर वाढत आहे. मात्र भारताबाहेर राहणाऱ्या ह्या मराठी कुटुंबांमधील पुढच्या पिढीत सर्वात मोठी उणीव जाणवते ती म्हणजे आपल्या मराठी मातृभाषेची. आणि त्यामुळे आपली मराठी भाषा पुढच्या पिढीत टिकेल की नाही अशी दाट शंका वाटते. ह्या मुलांना जर आपल्या मातृभाषेचे महत्व कळलेच नाही व तिच्याबद्दल आत्मीयता वाटलीच नाही तर पुढच्या एक दोन पिढ्यांमध्येच ही भाषा एकेका परीवारामधून नष्ट होईल ह्या गोष्टीची भीती वाटते.

प्रत्येकजण जगाच्या पाठीवर कोठेही असो, आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे टिकवायचा प्रयत्न करत असतो. त्याची उदाहरणे म्हणजे- मुलांना प्रसंगानुसार आपल्या पद्धतीचे कपडे घालून नटवणे, आपले सणवार…

He held my hand when I was little
Helped me to read, write and scribble
Here is a poem for him, my father
A person so honest, patriotic and noble

There is so much to share
So much to apprise
As endless memories
Flash before my eyes

Learning languages
Was his ultimate passion
Languages, he said, help bond and relate
And spark mutual communication

Sanskrit, Marathi, English and Hindi
Were the languages that he mastered
But to learn more and explore
Was a wish that he always fostered

With an eloquent speech
And a beautiful handwriting
He gave utmost importance…

Uma Abhyankar

Founder of http://uma.kitchen — simple, authentic recipes and interesting conversations

Get the Medium app

A button that says 'Download on the App Store', and if clicked it will lead you to the iOS App store
A button that says 'Get it on, Google Play', and if clicked it will lead you to the Google Play store