पंचशील

सामान्यत: पांच तत्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुध्दाने सामान्य माणसाकरीता आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्यासाठी, बोलणे व जे हानीकारक आहे त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पांच गुण सांगितलेले आहेत.

१. प्राणीमात्राची हत्या न करणे किंवा त्यांना इजा न करणे, त्यापासून अलिप्त राहणे.

२. चोरी करण्यापासून अलिप्‍त राहणे.

३. मिथ्याचारापासून अलिप्‍त राहणे.

४. खोटे तथा मिथ्य बोलण्यापासून अलिप्‍त राहणे.

५. मद्यपान करण्यापासून अलिप्‍त राहणे.

वरील पांच ही गुण महत्त्वाचे आहेत. आपण त्यांना नाकारु शकत नाही. जर नाकारले तर त्यापासून मानवाचे नुकसान आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पांचही गुण आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान होय.

शीलग्रहण करणे चांगले कां मानले जाते?

१. त्यामुळे व्यक्ती सुखी जीवनाकडे वाटचाल करतो.

२. तो दुस~याचा द्वेष करीत नाही.

३. शीलग्रहण करणारी व्यक्ती पूर्णत्व प्राप्‍त केलेली असते.

४. तो सर्वांचा चांगला मित्र असतो.

शीलग्रहण न केल्यामुळे कोणते परिणाम होतील.

१. व्यक्ती क्रूर बनतो.

२. व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होऊ शकतो.

३. कोणी त्याच्यावर प्रेम करणार नाही, त्याच्याशी एकनिष्ठ राहणार नाही.

४. तो दुस~याना व स्वत:शी क्लेषदायी असेल.

५. चांगल्या सूज्ञ व्यक्ती त्याच्याशी मैत्री करणार नाहीत.

सामान्यत: जगातील सर्व बौध्द पांचही शीलांचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सुखी व समाधानी असतात. प्रत्येक कुटूंब जर सुखी व समाधानी असेल तर तो समाज सुखी व समाधानी होईल. समाज सुखी झाला तर सर्व जग सुखी होईल.