बुद्धाची तत्त्वप्रणाली

१. स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे.

२. प्रत्येक धर्म महत्त्वाचा आहे असे नाही.

३. धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर किंवा आत्मा किंवा स्वर्ग किंवा पृथ्वी यांविषयीच्या सिध्दांतांशी वा कल्पनांशी संबंध असता कामा नये.

४. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे.

५. आत्माची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे.

६. प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे.

७. खरा धर्म माणसाच्या मनात वसत असतो शास्त्रात नाही.

८. माणूस व नीती हा धर्मा८. माणूस व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे.

९. नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही, ती जीवनाचा नियम झाली पाहिजे, कारण जगात ईश्वर नाही.

१०. धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे, त्याचा आरंभ वा अंत यांचे स्पष्टीकरण करणे नव्हे.

११. हितसंबंधांच्या कलहामुळे जगात दु:ख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय.

१२. संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता व दुस‍र्‍या वर्गाला दु:ख देते.

१३. समाजाच्या भल्यासाठी ह्या दु:खाचे कारण दुर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे.

१४. सर्व मानव समान आहेत.

१५. माणसाचे मुल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तुत्वाने होते.

१६. महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श, उच्च घराण्यातील जन्म नव्हे.

१७. सर्वांबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे.

१८. प्रत्येकाला अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे प्रज्ञेचीही आवश्यकता आहे.

१९. शीलाशिवाय प्रज्ञा ही घातक आहे.

२०. कोणतीही गोष्ट अस्खलनशील नाही. कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यांस पात्र आहे.

२१. कोणतीही गोष्ट अंतिम नाही.

२२. प्रत्येक गोष्ट कार्यकारणभावाच्या नियमाला धरुन आहे.

२३. कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट बदलास पात्र आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते.

२४. युध्द जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते चूक आहे.

२५. विजेत्यांची जितांबाबत कर्तव्य आहेत.

संक्षिप्त स्वरुपात बुध्दाची तत्वे ही आहेत. किती प्राचीन, पण किती नवीन! त्याची शिकवण किती व्यापक व किती सखोल आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर | संदर्भ- बुध्द की कार्ल मार्क्स