महामंगल सूत्रामध्ये उपदेशिलेल्या कल्याणकारी गोष्टी

१) मूर्खांची संगती करु नका.

२) विद्वानांची संगती करा.

३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.

४) अनुकूल देशात निवास करा.

५) चांगली कामे करा.

६) चित्तास स्थिर ठेवा.

७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.

८) विद्वान व्हा.

९) संयमी राहा.

१०) बोलणे मधुर, लाघवी व सत्य असू द्या.

११) मातापित्याची सेवा करा.

१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.

१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.

१४) दानधर्म करा.

१५) धम्माचरण करा.

१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.

१७) निर्दोष कर्मे करा.

१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.

१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.

२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.

२१) गौरवाची भावना जोपासा.

२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.

२३) क्षमाशील असा.

२४) संतुष्ट असा.

२५) कृतज्ञ असा. लीन असा.

२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.

२७) मधुर भाषी, मितभाषी असा.

२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.

२९) ब्रम्हचारी राहा.

३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.

३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.

३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.

३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)

३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ ठेवा.