सत, असत आणि पाप

१. शुभ कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी होऊ नका. पाप कर्म करु नका.

२. हा बौध्द जीवनमार्ग आहे.

३. मानासाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहीले पाहीजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की, त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करत राहाणे सूखकर आहे.

४. शुभकार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्य़ाड्या शुभ कर्माने शुभ कर्म वाढत राहाते.

५. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रितीने झाले असे समजावे.

६. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही. ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते कामा चांगले झाले समजावे.

७. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे, त्यात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो.

८. जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तो पर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. परंतु त्याचे शुभकार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात.

९. ते मला बरोबर साधणार नाही असे मानसाने शुभ कर्मासंबधी कधीच बोलू नये. थेंबथेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडेथोडे शुभ कर्म करीत राहीला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरुन जातो.

१०. चंदन, धुप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा(सदाचाराचा) सुगंध अधिक असतो.

११. धुप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो.

१२. शुभ हे शुद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडे भरते. थोडे शुभ घडता ते वाढत राहाते.

१३. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्यांचे फळ स्वीकारतांना अश्रु ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही.

१४. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्या प्रमाणे गाडीच्या बैलांच्या खुरांमागुन गाडीचे चाक धावत असते त्या प्रमाणे अशा माणसांच्या मागुन दु:ख धावत राहते.

१५. पापाला अनुसरु नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका.

१६. दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते.

१७. जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रु ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे.

१८. पाप कर्म करणार्‍या सुध्दा जो पर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तो पर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्या वेळी त्यांची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दु:खाशिवाय काहीच दिसत नाही.

१९. अशुभ मजपर्यंत येउन भिडणार नाही असे बोलत मानसाने अशुभाला कमी लेखु नये. थेंबाथेंबाने भांडे भरते अगदी अल्प, दुष्कृत्ये करता करता मुर्ख मनुष्य पापमय होऊन जातो.

२०. मानसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढ्विण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करु लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते.

२१. माणसाने एकदा पाप केले तरीत्याने परतपरत पाप करु नये आणि पापात आनंद मानु नये पापाची वाढ ही दु:खकारक होते.

२२. कुशळ कर्म करीत जा. अकुशल कर्म करु नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात.

२३. कामुकतेने दु:ख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दु:ख आणि भय या पासून विमुक्त होते.

२४. भुक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दु:ख आहे हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्व श्रेष्ठ सुख वाटु लागते.

२५. ज्या प्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित, स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करते.

२६. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दृष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वत:ला नेउन पोहचवितो.

२७ दृष्टकृत्ये आणि स्वताला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहभाग करता येतात. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात. ती मात्र करायला कठीण असतात.