५. भगवान बुध्दाचे पहिले प्रवचन (चालू)

शिलमार्ग

PC
Buddhism
2 min readJul 29, 2016

--

१. नंतर भगवान बुध्दाने परिव्राजकांना शीलमार्ग तथा सदगुणांचा मार्ग समजावून सांगितला.

२. त्याने त्यांना सांगितले की, शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय-

(१)शील, (२)दान (३)उपेक्षा (४) नैष्क्रम्य (५)वीर्य (६)शांती (७)सत्य (८) अधिष्ठान (९)करुणा आणि (१०).

३. या सदगुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुध्दाला विचारला.

४. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुध्द म्हणाले-

५. “शील म्हणजे नीतीमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता.”

६. “नैष्क्रम्य म्हणजे ऎहिक सुखाचा त्याग.”

७. “स्वार्थाची किंवा परतफेडीचा अपेक्षा न करता दुस~याच्या भल्यासाठी स्वत:ची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय.”

८. “वीर्य म्हणजे योग्य(सम्यक) प्रयत्न हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य.”

९.”शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय, कारण द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.”

१०. “सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीहि असता कामा नये.”

११. “ अधिष्टान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.”

१२.” करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.”

१३. “मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी-मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयीदेखील, मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे.”

१४. “उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलीत न होणे. परंतु निरपेक्षेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा.”

१५. “आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सदगुणाचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता (पूर्णत्वाच्या अवस्था) असे म्हणतात.”

Source: The Buddha and His Dhamma | Author: Dr. B. R. Ambedkar

--

--