Member-only story
AI in Agriculture
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
शेतीच्या समस्यांवरील अत्याधुनिक उतारा
मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नाडेला यांनी नुकतेच त्यांच्या भाषणात बारामतीतील एका अभिनव उपक्रमाचा विशेष उल्लेख केला. ऊस उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एआय) कशा प्रकारे प्रभावीपणे उपयोगात आणली गेली, हे त्यांनी नमूद केले. ‘फार्म ऑफ द फ्युचर’ (भविष्यातील शेती) या उपक्रमांतर्गत सुमारे १६ लाख स्थानिक शेतकरी जोडले गेले आहेत. उदाहरणार्थ आता, कमी पाण्यात, कमी जागेत आणि कमी खर्चात अधिक गोडसर ऊस उत्पादित करण्याचे उद्दिष्ट एआयच्या मदतीने साध्य झाले आहे. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रात सुद्धा एआयने मुसंडी मारली आहे.
कल्पना करा, पाण्याचा प्रत्येक थेंब, खताचा प्रत्येक कण, आणि बियाण्याचा प्रत्येक दाणा अत्यंत कार्यक्षमतेने वापरला गेला तर? एआयचे लक्ष्य हेच आहे. पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून उत्पादन वाढवणे व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा उद्देश आहे. शेती हा जोखमीचा व बेभरवशाचा व्यवसाय मानला जातो. हवामान, खत-बियाण्यांची उपलब्धता आणि बाजारभावातील चढ-उतार यांवर शेतीचा डोलारा सांभाळावा लागतो. पण एआयचा वापर करून विविध मार्गाने-प्रकाराने यातील कित्येक आव्हानांचा यशस्वी सामना करणे शक्य आहे, ते पाहुयात.
‘स्मार्ट’ शेतीत खुरपणी, पेरणी, पाणीपुरवठा, कापणी यांसारखी कामे स्वयंचलित पद्धतीने होऊ शकतात. ज्या देशांत मोठ्या प्रमाणावर जमीन आहे (उदा…