Member-only story
AI In Defense
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
युद्धभूमीवरील ‘कृत्रिम प्रज्ञा’
संरक्षण क्षेत्र आणि तंत्रज्ञान यांची पूर्वापार घट्ट मैत्री आहे. नवनवीन शोधांचा जसा सकारात्मक-सदुपयोग केला जातो, तसाच त्याचा उपयोग संरक्षणात, युद्धात व संहारक्षमतेत वाढ करण्यासाठीही केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एआय) त्याला कसा अपवाद असेल? देशाच्या पातळीवर वेगवेगळ्या धोक्यांपासून संरक्षण करावे लागते. ते अंतर्गत स्वकीयांकडून किंवा बाहेरील शत्रूंपासून असू शकते. ते जमिनीवर, पाण्यात, हवेत तर करावेच लागते; पण आधुनिक युगात ते आभासी (व्हर्च्युअल, सायबर) विश्वातील धोक्यांपासूनही करावे लागते. कल्पना करा की आपले ड्रोन युद्धभूमीचे निरीक्षण करून देत आहेत, यंत्रमानवी-सैनिक गस्त घालीत आहेत, क्षेपणास्त्रे त्यांना दाखवलेल्या लक्षाचा वेध अचूकपणे घेत आहेत. अशा सर्व कामांमध्ये एआयचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो, आणि मोठ्या प्रमाणात तो सुरूही झाला आहे. मानवी क्षतीची जोखीम कमी करणे, अचूकता वाढवणे, जेवढे युद्ध लांबून लढता येईल तेवढे पाहणे — हे सर्व एआयमुळे साध्य होत आहे. युद्धनीतीचा हा सारीपाट आता एआयच्या मदतीने अधिक सखोल, सर्वदूर, विविधांगी आणि कमीत-कमी नुकसान करणाऱ्या धोरणांचा क्रीडामंच झाला आहे. कोणत्या पद्धतीने युद्ध-संरक्षण विषयक कामांमध्ये एआय वापरले जाऊ शकते, ते पाहू.
युद्धमोहिमेच्या आखणीसाठी उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या माहितीचा उपयोग करून आक्रमणाच्या वाटा कोणत्या, रसद पुरवण्याचे रस्ते कोणते…