Member-only story
AI In Education
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
शिक्षणक्षेत्रासाठी प्रभावी साधन
पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अतिथी अध्यापक’ म्हणून शिकवताना एक गोष्ट सध्या लक्षात येत आहे की, नवनवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या ‘माहिती’च्या कक्षा रुंदावल्या असल्या, तरी ‘विचार क्षमता’कक्षा आकुंचन पावत आहे. वर्गात प्रश्न विचारल्यावर उत्तर शोधण्यासाठी विचार करायच्या ऐवजी हात थेट चॅटजिपीटीकडे वळतात. एवढेच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एआय ) शिक्षणाच्या विविध अंगांमध्ये प्रवेश वाढत आहे. औद्योगिक आणि सामाजिक गरजांमुळे सरकारही शिक्षणात एआयच्या वापरास प्रोत्साहन देत आहे.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एआय’ च्या आधुनिक दर्जाची केंद्रे स्थापन करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, युनेस्कोने २०२५ चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन ‘एआय आणि शिक्षण’ याला समर्पित केला आहे. करोना काळात शाळा-विद्यालये बंद असल्याने दूरस्थ (रिमोट) शिक्षणाबरोबरच एआय आधारित ऍप्सचा खासकरून स्वशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला होता तो आता इतर प्रक्रियांमध्ये पण सुरु झाला आहे. एकंदरीतच एआयचा शिक्षण क्षेत्रात कसा वापर होतो आहे, केला जाऊ शकतो ते संक्षेपात पाहुयात.
प्रत्येक वर्गात, सर्वसाधारणपणे , काही विद्यार्थी अतिशय हुशार असतात, काही सामान्य तर काहींना शिकणे कठीण जाते. शिक्षकांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिकवावे…