Member-only story
AI In Entertainment
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
तिसऱ्या मेंदूची ‘तिसरी घंटा’
(करमणूक क्षेत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’)
कल्पना करा, कामानिमित्त परगावी गेलेले आहात. कंपनीतून सायंकाळी हॉटेलवर परत आल्यावर घराच्या आठवणी सुरु होतायत. विरंगुळा म्हणून मोबाईलवर गाण्याचे ऍप सुरु करताच शिफारस येते — राग मारवा.
धक्का बसला ना! हा जादूटोणा नसून त्या ऍपमधील कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एआय) तुमचे मन-मूड ओळखतो आहे याचे लक्षण आहे. गाणी सुचवण्यापासून ते गाण्यांना चाल देणे, नाटके-पटकथा लिहिणे, प्रसिद्ध कलाकारासारखा हुबेहूब आवाज तयार करणे अशा अनेक गोष्टींसाठी एआयचा वापर होत आहे. इतर क्षेत्रांप्रमाणे करमणूक विश्वातही एआयने जोरदार प्रवेश केला आहे. त्याची काही उदाहरणे पाहूया.
गाणी, सिनेमे आणि व्हिडीओ सुचवणारे ऍप्स कसे काम करतात? प्रामुख्याने दोन प्रकारे — तुम्ही पूर्वी पाहिलेल्या गोष्टींशी साधर्म्य असणाऱ्या किंवा तुमच्यासारखी इतर माणसे काय पसंत करतात त्यानुसार. जेवढी तुमची माहिती (विदा, डेटा ) त्या ऍप्स कडे जास्त तेवढी त्यांची साधर्म्य ओळखण्याची क्षमता जास्त. याचा फायदा असा कि तुम्ही त्या ऍप्स वर जास्त वेळ खिळवून ठेवले जाणार, तेवढेच त्यांचे जाहिरातींचे उत्त्पन्न जास्त. तुमचे ‘लक्ष’ किंवा ‘अवधान’ हे चलनी नाणे झाले आहे.
पूर्वी व्यंगचित्रांचे चलचित्रपट (कार्टून ऍनिमेशन) हे मोठे जिकरीचे काम असायचे. कोठल्याही कृतीचे अनेक…