Member-only story
AI In Finance
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
वित्तीय सेवेसाही हजर !
रात्री अचानक मोबाईलवर एक संदेश (नोटिफिकेशन) आला –‘तुमच्या खात्यातून आताच एक व्यवहार झाला आहे, तो संशयित वाटत आहे, तो तुम्हीच केला आहे का?’ पाहतो तर काय! व्यवहारातील समोरच्या पक्षाचे नाव अनोळखी, ठिकाण दूरवरचे. लगेच व्यवहार रद्द करण्याच्या सूचना दिल्या आणि मोठा सुस्कारा सोडला. अशा संशयित किंवा गैरव्यवहारांची ओळख पटवणे आता ‘एआय’मुळे शक्य झाले आहे. जगभरात सेकंदाला लाखो व्यवहार होत असतात, त्यातून फसव्या गोष्टी खड्यासारख्या बाजूला काढणे मानवाला खूप अवघड (मुश्किल ही नही, नामूमकिन है) आहे ते काम एआय लीलया करते. अशा प्रकारे वित्तक्षेत्रात एआय अनेक कामांसाठी वापरता येते ते पाहुयात.
वित्तीय सेवा म्हटले की सर्वप्रथम बँक आठवते. बँकेचे मुख्य काम म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि त्याचा वापर करून इतरांना कर्ज देणे. हे कर्ज देताना फार काळजी घ्यावी लागते की ते बुडणार नाही याची. सगळेच कर्जदार काही बँकेतील लोकांच्या परिचयाचे-घरोब्याचे नसतात मग ठरवायचे कसे की कर्ज मागणारा अनोळखी मनुष्य ते वेळेत फेडेल की नाही? काही ठोकताळे अनुभवाने शिकता येतात पण ते फार प्रभावी नसतात. येथे एआय मदतीला येते. पूर्वीच्या असंख्य कर्ज व्यवहारांचा अभ्यास करून एआय कर्ज-पात्रतेचे प्रारूप (मॉडेल) तयार करतो. यामध्ये आर्थिक माहितीबरोबरच कौटुंबिक पार्श्वभूमी, खर्चाच्या सवयी यांचाही विचार होतो. हे मॉडेल कर्ज मंजुरीसाठी निर्णायक ठरते. त्यामुळे स्पष्टीकरणक्षमता (एक्स्प्लेनबिलिटी)…