Member-only story
AI In Healthcare
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
माणसाला गवसलेली नवसंजीवनी
आजही जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना वैद्यकीय उपचार सहजपणे उपलब्ध नाहीत. विशेषतः ग्रामीण भागातील दवाखान्यांपुढील रांगा आणि रुग्णालयातील गर्दी असे विदारक चित्र दिसते. भारतात तर लोकसंख्येसाठी पुरेसे डॉक्टर्सच नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारी वैद्यकीय शिक्षणाच्या संधी अपुऱ्या असून खाजगी शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या दुर्व्यवस्थेला काही उपाय आहे का? होय, आहे. एक आशेचा किरण म्हणजे एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स — कृत्रिम बुद्धिमत्ता). मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी एआय विविध रूपांत आणि प्रक्रियांमध्ये कसे उपयोगी पडते ते पाहूया.
आपल्याला बरे वाटत नसेल किंवा काही आजार असेल तर पहिली पायरी असते रोगनिदान. निदान जितके अचूक, तितकी पुढील उपचारयोजना प्रभावी ठरते. एक्स-रे चित्रांवरून ( स्कॅन) एआय अचूकपणे रोग ओळखू लागले आहे. हाड मोडलेले ठिकाण किंवा कर्करोगाच्या गाठी एआय सहज शोधू शकते आणि अनेक वेळा मानवी निदानापेक्षा अधिक अचूकतेने. कारण एआयने मानवी डॉक्टरच्या तुलनेत अनेक पटीने जास्त स्कॅन्स अभ्यासलेले असतात. काही आजार अनुवांशिक असतात आणि त्यांच्या शक्यता गुणसूत्रांच्या अभ्यासावरून ठरवता येतात.
मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार आधीच ओळखण्यात एआय प्रभावी ठरते. ऍस्ट्राझेनेका या कंपनीने एआय-मशीन लर्निंग वापरून १००० हून अधिक रोग निदान करण्याचे प्रारूप (मॉडेल) बनवले आहे. व्यक्ती तितक्या…