Member-only story
AI In Homes
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तुमच्या घरात
पूर्वी कुटुंबे मोठी होती. कामे आपापसात वाटून केली जायची. सध्या छोटी कुटुंबे प्रचलित असल्याने घरकामात मदतनीस-मावश्यांबरोबरच यंत्रांची सुद्धा सर्रास मदत घेतली जाते. ही यंत्रे नेमून दिलेलं काम इमानेइतबारे करत असली तरी कधी काय करायचं किंवा कसं करायचं असं काही डोकं लावत नाहीत. पण यातही बदल होत आहेत. या गोष्टी हुशार (‘स्मार्ट’) होत चालल्या आहेत. कपड्यांचा प्रकार, पोत (टेक्श्चर) बघून कपडे कसे व किती वेळ धुवायचे हे वॉशिंग मशीन ठरवू लागले आहे. याच्या मागे एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता) असते. हेच नाही तर अशा अनेक प्रकारे एआय आपल्या घरात ‘शिरले’ आहे, त्यातील काही उदाहरणे पाहुयात. ऊर्जेचे (इंधन, वीज) भाव दिवसोंदिवस वाढतच आहेत. जशी जशी नवीन यंत्रांची गरज भासत आहे तशीच विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या खर्चाला आळा घालण्यासाठी म्हणजेच विविध उपकरणांचे ऊर्जा नियोजन करण्यात एआय मदत करते. ‘स्मार्ट’ मीटर आता विजेची बचत करणे, देखभाल करणे यांसारखी कामे करून आपले पैसे वाचवतात. या मीटर मध्ये, वीज-वापरासंबंधीचा ‘डेटा’ (माहिती, विदा) अभ्यास करून एआय मॉडेल्स निर्णय घेत असतात. सरकारसुद्धा आपल्या पातळीवर ‘स्मार्ट’ ग्रीडचा वापर करून वीज नियंत्रणात सुसूत्रता आणत आहेत.
‘अलेक्सा’, ‘गुगल होम’ सारखी संभाषण-यंत्रे तुम्ही दिलेल्या आवाजी-आज्ञा समजतात. एखादे गाणे लावणे, प्रश्नांना उत्तरे देणे, हवामानाचा अंदाज सांगणे, घरातील…