Member-only story
AI In Pocket
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तुमच्या खिशात
“हे सिरी, उद्या पाऊस पडेल का?” किंवा “हे गुगल, मला जगजीत सिंग यांची गझल ऐकवशील का?” अशा सूचना दिल्या की मोबाईलआज्ञाधारक नोकराप्रमाणे ती कामे त्वरित करतो. गाडी चालवताना रस्ता दाखवणे, पुस्तक खरेदीसाठी शिफारस करणे, किंवा वाढदिवसाची आठवण करून देणे, ही कामे तो सहज करतो. कॉल आणि संदेशापुरता मर्यादित असलेला मोबाईल आता एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) मुळे ‘स्मार्ट’ झाला आहे. तुमच्या नकळतच, एआय तुमच्या खिशात पोहोचला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो, त्यामागील प्रणाली काय आहे, आणि त्याचे फायदे व संभाव्य धोके यावर नजर टाकूया.
आज बहुतेक लोकांकडे स्मार्टफोन आहेत, आणि त्यात एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामुळे शिक्षण, आरोग्य, खरेदी-विक्री आणि प्रवास या क्षेत्रांत लोकांना सहज प्रवेश मिळतो, ज्यामुळे समाजाचे लोकशाहीकरण वाढलेच आहे.
एआयद्वारे आपल्याला उत्तरे मिळतात, कामे ही होतात, पण अशा बऱ्याच ऍप्स मध्ये जाहिराती सुद्धा दाखवल्या जातात. तुम्हाला जरी सेवा फुकट मिळत असली तरी विविध उत्पादनाच्या जाहिराती दाखवून खरेदीस उद्युक्त केले जाते. आपले मन वळवण्याचा अथवा विशिष्ट पद्धतीने बनवण्याचा प्रयत्नही केला जातो. समाज-माध्यमातील (सोशल मीडिया) शिफारसींनी समाज-मन विशिष्ट अंगाचे बनवण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे हे सर्व वापरताना बोलविता धनी कोण आहे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.