Member-only story
AI In Translation
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
बहुभाषी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’
पंचवीस-एक वर्षांपूर्वी कामानिमित्त काही महिने जपानमध्ये राहण्याचा योग आला होता. जपानी भाषेचे अगदीच जुजबी ज्ञान असल्याने रोजच्या व्यवहारात फलक वाचताना, स्थानिकांशी बोलताना नुसती भंबेरी उडायची. तेंव्हा मोबाइल अत्यंत प्राथमिक अवस्थेत होते. भाषांतर करणारे, चित्रलिपीवरून अर्थ सांगणारे त्यात काहीही नसायचे. आता मात्र परिस्थिती एकदम बदलली आहे. दुभाष्याचे काम करणाऱ्या संगणक प्रणाल्या (ऍप्स) आता उपलब्ध आहेत. हा चमत्कार कृत्रिम बुद्धिमत्ते (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एआय) मुळे शक्य झाला आहे.
अनादी काळापासून भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विविध ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतींचा आधार तेथील भाषा आहेत. नाते एवढे अतूट की अगदी अस्मितेपर्यंत पोहोचते कधी कधी. सुदूर प्रवासाच्या तसेच संभाषणाच्या सोयी जशा जशा वाढल्या आणि विविध संस्कृतीच्या लोकांशी संपर्क वाढला तशी त्यांची भाषा येण्याची गरज निर्माण झाली. दुभाषांचे महत्व वाढले. बहुभाषी असणे तर विद्वत्तेचे लक्षण समजले जाऊ लागले. पण इच्छा असूनही नवीन भाषा शिकणे हे सर्वसामान्य लोकांना कठीण जाते. त्यावर उपाय म्हणून भाषांतर करणाऱ्या प्रणाल्या (अल्गोरिदम्स) बनवण्यावर संशोधन सुरु झाले.
भाषांतर करणे हे अजिबात सोपे काम नाही. मानवालासुद्धा ते क्लिष्ट वाटते तर संगणकाचे काय घेऊन बसलाय. प्रथम शब्दाला-शब्द, नंतर शब्द-समूहाचा विचार करून नंतर वाक्यच्या-वाक्य यांचा…