Member-only story
AI In Transportation
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
‘वंडर कार’ वास्तवात !
भारतातील मालवाहतूक क्षेत्राला दररोज साठ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते, असे एका अभ्यासात लक्षात आले. वाहने वाहतूककोंडीत अडकतात, वेळ आणि इंधन वाया जाते, शिवाय मनस्तापही होतो. आपणही हा त्रास अनुभवलाच असेल. अशा वेळी वाटते, कोणी दुसऱ्यानेच आपली गाडी चालवली तर? गर्दी टाळून लवकर पोहोचवले तर? हे सर्व आता ‘एआय’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स — कृत्रिम बुद्धिमत्ता) मुळे शक्य होत आहे. कार, ट्रक स्वयंचलित होत आहेत. जलद पोहोचवणारा मार्ग एआय सुचवत आहे. आरामदायी प्रवासाचे दिवस आता सर्वसामान्यांसाठी काही दूर नाहीत. फक्त स्वयंचालनातच नव्हे तर वाहतूकक्षेत्रातील इतर गोष्टींमध्ये पण एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे त्याची काही उदाहरणे पाहुयात.
‘वेअमो’ कंपनीच्या स्वयंचलित गाड्या सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर धावत आहेत. या गाड्या ‘लायडार’ तंत्रज्ञानाच्या कॅमेर्यांच्या मदतीने त्रिमितीय चित्रण करतात, सभोवतालचा अंदाज घेतात, रस्ता ओळखतात आणि अडथळा नसेल तर मार्गक्रमणा करतात. वाहतूक दिवे आणि इतर सुरक्षा चिन्हेही त्या ओळखतात व त्यानुसार निर्णय घेतात. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांना स्टिअरिंग व्हील आपोआप हलताना पाहून जरा भुताटकी वाटू शकते पण तेढ्यापुरतेच. गंतव्यापर्यंत आरामात सोडल्यावर तंत्रज्ञानाचे कौतुकच वाटते.
चौकात उभे ठाकलेले वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) आपल्या संयमाची परीक्षा घेत असतात. गर्दी कमी असुदे वा जास्त ते…