Member-only story
AI vs Human Intelligence: Myths And Realities
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
मानवी विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता? भ्रम आणि सत्य
मानवी बुद्धिमत्तेचे अनेक पैलू आहेत. ढोबळ मानाने पाहता, माहिती ग्रहण करणे, पृथ:करण करणे, त्यातील महत्वाच्या गोष्ट ‘ज्ञान’ म्हणून साठवणे आणि नंतर त्याचा उपयोग नवनवीन कामांसाठी करणे, हे सर्व त्यात समाविष्ट होते. सामान्य समजुतीनुसार, जेंव्हा संगणक प्रणालीसुद्धा अशी कामे थोड्याफार फरकाने करते, तेंव्हा तिला ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एआय, AI) असे म्हटले जाते. यातून मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात समानता असल्याचे गृहीत धरले जाते, ज्यामुळे बरेच भ्रम निर्माण होतात. या दोन्ही बुद्धिमत्तांचे प्रकटीकरण जरी समान दिसत असले तरी त्यामागच्या प्रक्रिया, गरजा आणि त्यांचा प्रभावीपणा हा खूप वेगळा आहे. त्यामुळे निर्माण होणारे भ्रम आणि त्यामागील सत्य स्पष्ट करणे महत्वाचे आहे.
एखाद्या लहान बाळाला एकदाच सांगितले की, “हे भू-भू आहे, ही मनी-माऊ आहे”, तर त्याला त्यानंतर ते प्राणी ओळखणे कधीही अवघड जात नाही, अगदी ते वेगळ्या प्रकारचे, जातीचे,आकाराचे व रंगांचे असले तरीही. ही प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनात साधी वाटते, पण ती अत्यंत अद्भुत आहे. मानवी बुद्धिमत्तेला एखाद-दुसऱ्या उदाहरणातून ‘ज्ञान’ मिळते, जे त्याला पूर्वी न पाहिलेल्या गोष्टी ओळखण्यात मदत करते.