Member-only story
Circle of Competence
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
गड्या, आपुला गाव बरा
(क्षमतेच्या कक्षेची जाण | जे कळे तेच खरे )
हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सत्तर-ऐंशीच्या दशकात एकामागून एक यशस्वी चित्रपट दिले. ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. १९८३ च्या ‘कुली ‘ चित्रपटातील दुर्दवी अपघातातून सावरून आल्यानंतर तर ते जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनले होते. कदाचित याच लोकप्रियतेचा फायदा व्हावा म्हणून (किंवा खरोखरच्या जनसेवेच्या ओढीने) त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. लोकसभेच्या निवडणुकीत अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथून त्यांनी माजी मुख्यमंत्री बहुगुणांचा मोठा पराभव केला. पण तीन-एक वर्षातच, झालेल्या आरोपांमुळे, त्यांनी वैतागून, नाराज होऊन, राजकारणाला ‘दलदलीसारखं’ म्हणत या क्षेत्राचा निरोप घेतला. जे व्यक्तिमत्त्व एका चित्रपटाला खांद्यावर उचलू शकत होतं, ज्याच्या संवादांनी लाखो लोक भारावून जायचे, आणि ज्याने एक पूर्ण युग घडवलं, तेच व्यक्तिमत्त्व राजकारणातील खेळी, सत्तेचे समीकरण आणि प्रशासन यांमध्ये अपयशी ठरलं. कारण तो त्यांचा ‘रंगमंच’ नव्हता. खरं तर हे अपयश नव्हे, तर एक शिकवण आहे. एका क्षेत्रातील टाळ्यांची ग्वाही दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून देईलच, असं नाही. शेवटी, ‘गड्या, आपुला गाव बरा’ असे म्हणावे लागते.
आज बहु-गुणी असण्याचा गौरव होतो. अगदी ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स’ म्हणजेच ‘सगळ्याच गोष्टी थोड्याफार प्रमाणात येतात’ ही गोष्ट काहीशी प्रतिष्ठेची मानली…