Member-only story
Digital Workforce
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
कोणत्याही मोठ्या शहरात सकाळी अनेक ठिकाणी मजूर-अड्डे भरलेले दिसतात. मुकादम येऊन आवश्यक कौशल्यांप्रमाणे मजूर निवडतो. ही कौशल्ये शाररिक-श्रम स्वरूपाची असतात. कल्पना करा की संगणकीय म्हणजेच ‘डिजिटल’ कामांसाठीपण असे अड्डे भरले तर आणि त्यातील मजूर सदेह नसून आभासी असतील तर? हा केवळ कल्पनाविलास नाही. असे ‘डिजिटल’ कर्मचारी आता प्रत्यक्षात उपलब्ध होऊ लागले आहेत. यांनाच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता कर्मचारी’ (एआय एजन्ट्स) म्हणतात.
आपण चॅटजिपीटीसारख्या संवाद-आधारित प्रणाल्या (ऍप्स, चॅटबॉट्स) पहिल्या असतील. पण मग एआय एजन्ट्स त्यापेक्षा वेगळे कसे? एआय एजन्ट्स चॅटबॉट्सच्याही पुढची पायरी आहे. ते केवळ संभाषणच नाही तर प्रत्यक्षात कृती देखील करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला काश्मीरची सहल आयोजित करायची असल्यास चॅटबॉट द्वारे विमानसेवा, राहण्यासाठीची हॉटेल्स, प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती घेऊ शकता एवढेच. पण एआय एजन्ट्स फक्त माहितीच देत नाहीत, तर ते सहलीचे तुमच्या बजेट नुसार पूर्ण नियोजन करणे, बुकिंग करणे, अगदी तिकिटे काढण्यापर्यंत सर्व कामे करतात. अगदी खऱ्याखुऱ्या प्रवास-सल्लागार (ट्रॅव्हल एजन्ट) प्रमाणे.
एआय एजन्ट्स आता विविध क्षेत्रांत उपयोगी ठरत आहेत. संगणकीय प्रणाली (ऍप्स) बनवणे, विक्री-विपणनाची प्राधान्यक्रम ठरवणे, जोखीम ओळखणे, डेटा (माहिती, विदा) यांचे पृथ:करण करणे, विविध प्रक्रियांमध्ये स्वयंचलितता आणणे, नव-नवीन कल्पनांच्या सृजनासाठी पर्याय सुचवणे, यासारख्या अनेक निर्णय आणि कृती…