Member-only story
First Principles Thinking
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
‘आद्य तत्वविचारा’ चे महत्व
इलेक्ट्रिक गाड्या जरी सध्या लोकप्रिय झाल्या असल्या, तरी त्यांचा उगम अलीकडचा नाही. अनेक दशकांपूर्वीच त्यांची निर्मिती झाली होती, पण त्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरल्या. आधुनिक काळातही मोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे फारशा वळल्या नाहीत. मग एक अवलिया आला आणि कोठलीही पार्श्वभूमी अथवा अनुभव नसताना त्याने या क्षेत्रात उडी मारून पूर्ण चित्रच बदलवून टाकले.
त्याने स्वतःला विचारले, “प्रदूषण कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असूनही पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक गाड्या का नाहीत?” संशोधनाअंती समजले की बॅटरीच्या अवास्तव किमतीमुळे मोठ्या कंपन्या या गाड्या तयार करत नाहीत. मग पुढचा प्रश्न : “बॅटरी इतकी महाग का आहे?” बॅटरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोणते? उत्तर मिळाले : लिथियम, निकेल, कोबाल्ट, ग्रॅफाइट यांसारखे काही दुर्लभ धातू. पुढील प्रश्न : “या कच्च्या मालाची एकत्रित किंमत किती?” उत्तर मिळाले : तयार बॅटरीच्या किंमतीपेक्षा खूपच कमी! येथे आशेचा किरण सापडला. मग विचार आला, “निर्मिती प्रक्रिया अधिक स्वस्त करता येईल का?”, “डिझाइन बदलता येईल का?”, “मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास किंमत आणखी कमी होईल का?” अशा सततच्या मूलभूत प्रश्नांमधून उत्तर शोधत त्याने बॅटरी निर्मितीत क्रांती घडवली. जे भल्याभल्यांना जमले नाही ते एका नवख्या माणसाने केले आणि प्रस्थापितांना मागे टाकले. त्या माणसाचे नाव इलॉन मस्क आणि त्या गाडीचे नाव…