Member-only story
Introduction to Mental Models
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
‘विचार-चित्रांची’ तोंडओळख
जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार कोण? असे विचारल्यावर बहुतेकांचे उत्तर असेल — वॉरन बफे. पण त्यांचे तुलनेने कमी प्रसिद्ध, तरीही असामान्य प्रतिभेचे सहकारी म्हणजे चार्ली मंगर. कोणत्याही समस्येवर किंवा प्रसंगावर चार्ली विविध दृष्टिकोनातून विचार करायचे. या दृष्टिकोनांना ते मेंटल मॉडेल्स (मन:प्रारूपे) म्हणत. सोप्या भाषेत याला आपण ‘विचार-चित्रे’ म्हणू शकतो, कारण एखाद्या परिस्थितीला दिला जाणारा प्रतिसाद हा आपल्या मनात कोरलेल्या विचार-चित्रावर अवलंबून असतो. मानवी मेंदू सुरवातीपासून विचार करण्याची ऊर्जा वाचवण्यासाठी अशा विचार-चित्रांचा आधार घेतो आणि सहज निर्णय घेतो.
आपण स्वतःला तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ विचार करणारा प्राणी समजतो, पण प्रत्यक्षात असे सतत घडत नाही. अनेकदा भावनांच्या प्रभावाखाली, सवयीने किंवा पूर्वग्रहदूषित पद्धतीने निर्णय घेतले जातात. प्रदीर्घ अनुभव आणि वारंवारतेमुळे अशा पद्धती विकसित होतात. विविध प्रसंगांना तोंड देण्यासाठी वेगवेगळी विचार-चित्रे वापरण्यात येतात. आपण सर्वच जण यांचा वापर करीत असलो तरी काही विशिष्ठ विचारचित्रे अतिशय प्रभावीपणे उपयोगात आणता येतात. पुढील लेखांमध्ये अशीच काही विचार-चित्रे उदाहरणांसह पाहुयात.
या सदरचे-लेखमालेचे शीर्षक ‘तिसरा मेंदू’ असे आहे. हे बाह्य किंवा अतिरिक्त बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. जर आपल्या भात्यात अनेक मेंटल मॉडेल्स (विचार-चित्रे)…