Member-only story
Inversion
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
उलटा विचार, यशाचा आधार
एखादा माणूस सतत नकारात्मकतेने बघत असेल, तर ते चांगले मानले जात नाही. पण जर हा दृष्टिकोन समजून आणि योग्य प्रकारे वापरता आला, तर तो खूप फायद्याचा ठरू शकतो. हाच विचार एका प्रसिद्ध मेंटल मॉडेलचा (मन:प्रारूप) म्हणजेच ‘विचार-चित्राचा’ गाभा आहे. त्याला ‘इन्व्हर्जन’ किंवा सोप्या भाषेत ‘उलटा विचार’ म्हणता येईल. समजा, तुम्हाला तब्येत सुधारायची आहे. तुम्ही सकस आहार घ्याल, व्यायाम कराल, हे स्वाभाविक आहे. पण जर उलटा विचार केला, तर तुम्ही पाहाल की तब्येत बिघडवणाऱ्या सवयी कोणत्या आहेत आणि त्या टाळता येतात का? जंक फूड कमी करता येईल का? व्यसने सोडता येतील का? दिवसभर कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर बसण्याची सवय मोडता येईल का? केवळ या नकारात्मक गोष्टी बंद केल्या, तरी तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. हाच ‘उलट्या विचारा’चा गाभा आहे. समस्येकडे वेगळ्या (उलट्या) दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. चुकांकडे लक्ष देऊन त्या टाळल्या, तर यशस्वी होण्याची शक्यता वाढते. भारतीय तत्वज्ञानातही याची बीजे सापडतात. सत्याचा शोध घेताना नेति-नेति (हेही नाही, तेही नाही) ह्या पद्धतीने काय टाळायचे ते आधी ठरवले, की अंतिम सत्याचा-वास्तवतेचा मार्ग स्पष्ट होतो. चार्ली मंगर एकदा म्हणाले होते, “मला फक्त हेच माहित करायचं आहे की मी कुठे मरणार आहे, म्हणजे मी तिथे जाणार नाही.” हा विनोदी वाटणारा; पण खोल अर्थ असलेला विचार उलट्या विचारसरणीचे प्रमुख तत्व स्पष्ट करते. अपयश टाळणे, अनेकदा यश मिळवण्याइतकेच महत्त्वाचे…