Member-only story
Map is not the territory
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
नकाशा म्हणजेच भूभाग नव्हे
पाश्चिमात्य देशांच्या नजरेत भारताची प्रतिमा बदलत आहे. ‘सापांचे खेळ करणाऱ्यांचा देश’ हे जुनं चित्र आता मागे पडलं असलं, तरी काही चित्रपट व बातम्यांमुळे भारतात सर्वत्र गरीबी व अस्वच्छता असल्याचं दाखवलं जातं. ‘जागतिक भूक/उपासमारी निर्देशांक’ (ग्लोबल हंगर इंडेक्स) मध्ये भारत आजही पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेच्या मागे (दाखवलेला) आहे.
हे सर्व पाहून एखादा परदेशी व्यावसायिक भारतात येतो आणि पाहतो तर काय, चित्र तेवढे काही वाईट नाही. इतकं कमी प्रति-व्यक्ती उत्पन्न असलेला देश जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारांपैकी एक कसा असू शकतो? अतिप्रगत देशांमध्ये सुद्धा कागदावर मतदान होत असल्याने मोजणीस महिनोंमहिने लागतात तर भारतात काही दिवसात निकाल जाहीर पण होतो. यूपीआय व्यवहार करणारा फेरीवाला, नेटफ्लिक्सवरील शो-वर चर्चा करणारा रिक्षाचालक किंवा मोबाईलवर हवामानाची माहिती पाहणारा शेतकरी, अशी एक ना अनेक उदाहरणे दिसतात. त्यामुळे जगापुढे आलेल्या-ठेवलेल्या प्रतिमेत काही अंशी सत्य असले तरी ते पूर्ण वास्तव नक्कीच नाही. याच विसंगतीच्या मेंटल मॉडेलला (मन:प्रारूप) अथवा विचार चित्राला ‘मॅप इज नॉट द टेरिटरी’ म्हणजेच ‘नकाशा-भूभाग-फारकत’ किंवा सोप्या भाषेत ‘नकाशा म्हणजेच भूभाग नाही’ असे नामकरण करू शकतो. पोलिश-अमेरिकन वैज्ञानिक आल्फ्रेड कोर्जिब्स्की यांनी मांडलेली ही संकल्पना चार्ली मंगर आणि शेन पॅरिशसारख्या विचारवंतांनी जनमानसात…