Member-only story
Okham’s Razor
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
सोप्या मार्गाचे शहाणपण
काल दुपारची गोष्ट. माझ्या मोबाईलचं वाय-फाय काही चालत नव्हतं. खूप प्रयत्न केले, सेटिंग्ज तपासली, इंटरनेटवर माहिती वाचून काही गोष्टी केल्या, युट्युबवरील व्हिडीओ, एक ना अनेक उपाय केले पण ते वाय-फाय काही प्रतिसाद देईना. संगणक क्षेत्रातील असूनही उत्तर सापडत नसल्याने साहजिकच चीड-चीड वाढली. मोबाईलला, त्यातल्या सॉफ्टवेअरला, एवढच काय, संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्राला आणि नेहमीच्या सवयीने शासनाला (!) पण नावं ठेऊन झाली पण समस्या काही सुटेना. संध्याकाळी घरी आल्यावर माझ्या छोट्या मुलीला हे कळताच ती म्हणाली की बाबा जरा डिस्कनेक्ट करून पुन्हा कनेक्ट करून बघा ना? आणि खरोखरच त्याने ते अडेल-तट्टू वाय-फाय चालू झाल ना! उगाच काहीतरी क्लिष्ट, गुंतागुंतीचे, किचकट करत बसलो पण उत्तर मात्र सोपे होते. ह्यालाच म्हणतात ‘काखेत कळसा गावाला वळसा’. या मेंटल मॉडेलला (मन:प्रारूप) अथवा विचार चित्राला ‘ऑकम्स रेझर’ किंवा साध्या भाषेत ‘सोप्या मार्गाचे शहाणपण’ म्हणू शकतो. २०२३ च्या “भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण” (टी-आर-ए-आय) यांच्या अहवालानुसार, भारतातील ८५% पेक्षा जास्त ब्रॉडबँड तक्रारी केवळ मोडेम रीस्टार्ट करून किंवा सैल कनेक्शन तपासून सोडवल्या जातात तरीही बहुतेक लोकं, अधिक जटिल अशा तांत्रिक बिघाडांचा अंदाज लावतात आणि साध्या उपायांकडे दुर्लक्ष करतात. नेहमी खोल विचार करण्याची व गुंतागुंतीची स्पष्टीकरणे देण्याची ही प्रवृत्ती खरंतर एक मानसिक पूर्वग्रह दर्शवते. येथे ‘सोप्या मार्गाचे शहाणपण’…