Member-only story
Opportunity Cost
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
गत-संधीची किंमत
भारतात दरवर्षी लाखो तरुण-तरुणी यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धापरीक्षांची तयारी करताना दिसतात. काही जण यासाठी पाच-सहा वर्षांचं आयुष्य खर्च करतात. मात्र या परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक असून, अंतिम यशस्वी होणाऱ्यांची संख्या अत्यल्प असते. देशसेवा, स्थैर्य आणि प्रतिष्ठा हे आकर्षण मान्य असले तरी, बहुतांश जणांच्या पदरी फक्त थकवा, निराशा आणि वाया गेलेली वर्षं येतात. मग याचा विचार का होत नाही? या गेलेल्या वर्षांची भरपाई कशी होणार? याच काळात दुसरे काही ठीकठाक (खूप लाभाचे नसले तरी) करता आले नसते का? खरेतर अशा ‘अभ्यासू’ तरुणांना विविध क्षेत्रात जाता येऊ शकते. विधी-कायदे, संगणक, वित्त इत्यादी क्षेत्रात खूपच गरज आहे. परदेशी भाषा शिकून कौशल्याधारित कामे भारताबाहेर मिळू शकतात. सध्या जोमात असलेल्या स्टार्टअप्समध्ये करिअर घडवण्याची संधी आणि शिकवण्याची आवड असेल तर त्याही पेशात कितीतरी संधी आहेत. एक ना अनेक. पण सर्व लक्ष एका परीक्षेकडे लागल्यामुळे उर्वरित सर्व दारं नकळत बंद होतात. मग या ‘गमावलेल्या’ संधींचा का विचार होत नाही? याच प्रश्नावर आधारित ‘मेंटल मॉडेल’ (मन: प्रारूप) अर्थात विचार-चित्राला ‘ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट’ म्हणजेच ‘गत संधीची किंमत’ असे म्हणू शकतो.
आपण आयुष्यात दररोज असंख्य निर्णय घेतो. काही मोठे, काही छोटे. पण प्रत्येक निर्णयामागे एक वा अनेक गत-संधींच्या किंमती दडलेल्या असतात, म्हणजेच आपण निवडलेली गोष्ट न करता मिळू शकणाऱ्या पर्यायाचं मूल्य. ही…