Member-only story
Second Order Thinking
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
दृष्टी पलीकडील सृष्टी
ब्रिटिश राजवटीतील एक गोष्ट सांगतात. एका गावात सापाचं प्रमाण फार वाढलेलं होतं. या समस्येवर तोडगा म्हणून अधिकाऱ्यांनी एक उपाय-योजना केली. गावात दवंडी पिटवली की जे लोक साप पकडून कार्यालयात आणतील त्यांना इनाम देण्यात येईल. जेवढे जास्त साप, तेवढी अधिक इनामाची रक्कम. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने मृत साप जमा होऊ लागले. काही दिवस उलटून गेल्यावरही सापांचा त्रास काही कमी झाला नाही. अधिकाऱ्यांना शंका आली. तपास केल्यावर असे सापडले की लोक साप पाळून त्यांची प्रजनन करून पैसे कमवायला लागले आहेत. हे लक्षात येताच त्यांनी इनाम योजना थांबवली. पैसे मिळवण्याचा मार्ग बंद झाल्यावर लोकांनी साप मोकळ्यात सोडले. पूर्वीची समस्या आता अधिक गंभीर झाली. ज्या उद्देशाने योजना सुरू केली होती, त्याचे फायदे केवळ थोड्या काळापुरते दिसले. मात्र लोकांनी त्याचा गैरफायदा घेतल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला.
म्हणून कोणताही विचार करताना, निर्णय घेताना नजीकच्या परिणामांचाच फक्त विचार न करता त्याचा संभाव्य व दूरगामी परिणामांचा विचार करणे या मेंटल मॉडेल (मन:प्रारूप) म्हणजेच ‘विचार-चित्रा’ला ‘सेकंड ऑर्डर थिंकिंग’ अथवा ‘दूरगामी परिणामांचा विचार’ म्हणू शकतो. यापद्धतीत एका मागून एक प्रश्न विचारत राहायचे की ‘मग काय होईल?’, ‘मग काय होईल? असा एकामागून एक मागोवा घेत विचार केला जातो. सर्वसाधारणपणे, आपण एकाच प्रश्नाचे उत्तर शोधून कामाला लागतो. याला ‘फर्स्ट ऑर्डर थिंकिंग’…