Member-only story
Trump Tariffs: Strategic Anarchy
Original draft of an article in Marathi in the newspaper Sakal
ट्रम्प यांचे ‘सुनियोजित’ अराजक?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून येताच त्यांनीं नवनवीन धोरणांची घोषणा करण्याचा सपाटाच लावला. त्यातील सर्वात महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या नव्या आयात शुल्कांची (टॅरिफ्स) मोठी घोषणा करताच, अमेरिकेतील आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यात भरीस भर म्हणजे दर दिवशी काहीतरी नवीन घोषणा. एके दिवशी सर्वांना १०%, नंतर एके दिवशी, कोणत्यातरी अजब सूत्रानुसार कोणाला २०, २६, ३७, ५०% असे काहीतरी आणि नंतर चीन सोडून इतरांना ९० दिवसांसाठी सूट, म्हणजेच पून:श्च १०%. याने मत-मतांतरांचा गलबला होणार नाही तर काय. महागाई खूप वाढेल, व्यापारयुद्ध पेटेल, अमेरिकन नागरिकांना आर्थिक फटका बसेल, अशा सरधोपट व पारंपरिक प्रतिक्रिया लगेचच उमटल्या. जगभर उमटलेल्या या सगळ्या प्रतिक्रिया वरवर पाहता रास्त वाटू शकतात; परंतु या प्रतिक्रियांमागे एक मूलभूत गोष्ट अनेकांनी दुर्लक्षित केली ती म्हणजे ही खेळी म्हणजे केवळ आर्थिक राष्ट्रवादाची भावना पेटवण्यासाठी नाही, केवळ अमेरिकेला सर्वश्रेष्ठ करण्याचे (‘मागा’ : मेक अमेरिका ग्रेट अगेन) निवडणुकीतील घोषणापूर्तीची वाटचाल नव्हे, तर ही वाटत आहे एका धोरणात्मक अस्थिरतेची, जाणीवपूर्वक आखलेली सुनियोजित रणनीती. या घडामोडींचं गांभीर्य लक्षात घ्यायचं असेल, तर आयातशुल्कांचं स्वरूप पाहण्याऐवजी, त्यामागचा उद्देश समजून घ्यावा लागतो. हे टॅरिफ्स म्हणजे केवळ संरक्षणात्मक उपाय नाहीत; ही आहेत…