“अगं , आपल्या शेजारच्यांचा वरुण पण आय. टी. मध्ये जॉब ला लागला!”, आई.
“आई! मी आय. टी मध्ये नाहीये, मी सॉफ्टवेअर इंजीनियर आहे”, उगीचच त्रस्त झालेली मी.
अमेरिकेत इतकी वर्षे राहिल्याने, इथे ‘आय. टी.’ ला एक विशिष्ट अर्थ असल्याची जाणीव असल्याने, ह्या दोन पदव्यां मधला फरक जगात सर्वांनी जोपासावा, असा माझा हट्ट.
“अगं हो, म्हणजे तो सुद्धा क्लाऊड टेकनॉलॉजि मध्ये काम करणार म्हणाला — तू सुद्धा ऍमेझॉन क्लाऊड मध्ये आहेस ना ?”
“हो बरोबर!”
आई च्या follow-up प्रश्नाच्या accuracy वर खुश होत मी म्हणाले. आणि मग पुढे काही वेळ क्लाऊड वरून एक चित्तवेधक अशी चर्चा झाली.
whatsapp, facebook इ. मोबाईल अँप्स प्रचलित असलेल्या ह्या काळात “क्लाऊड टेकनॉलॉजि” ही संकल्पना बहुतेक सर्वांच्या ऐकण्यात आलेली जाणवते. आपण सर्व कुठल्या न कुठल्या तरी माध्यमातून ह्या टेकनॉलॉजि चे उपभोक्ते आहोत. कुठलीही modern website किंवा App जर तुम्ही वापरत असाल, तर बहुतेकदा त्याच्या मागे क्लाऊड वापरलेला असतो. अशा ह्या सर्वव्यापी टेकनॉलॉजि चा मूलभूत परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न. परंतु पुढे वाचण्या अगोदर एक छोटीशी विनंती अशी कि internet browsing, app development ह्या संकल्पनांवर आधारित असलेले आमचे लेख तुम्ही वाचावे म्हणजे त्या पार्श्वभूमीवर cloud computing ह्या विषयात तुम्हाला अधिक रुची वाटेल.
क्लाऊड समजण्यासाठी आधी scalability समजणे महत्वाचे आहे. Scalability म्हणजे वाढत्या गरजेला पुरतील इतक्या संसाधनांची सोय करण्याची क्षमता. वास्तविक जीवनातले उदाहरण घ्यायचे तर कुठलाही नवीन business सुरु करताना scalability चा विचार करावा लागतो. समजा तुम्हाला सुरुवातीला दर महा २० orders मिळत असतील — तर कदाचित त्या तुम्ही एकटे पूर्ण करू शकाल. पण business वाढत गेल्यावर जर महिन्याच्या २० वरून, दिवसाला २० अश्या orders येऊ लागल्या तर मग तुम्हाला हाता खाली माणसे नेमावी लागतील. लागणाऱ्या साधनांची संख्या देखील वाढत जाईल. आणि ह्या सर्वांच्या management चे काम ही तुमच्यावर येईल.
Website किंवा App चालवताना देखील असेच आवाहन असते — सुरुवातीला जरी समजा एका computer (server) वर काम होत असेल तरी App पॉप्युलर झाल्यावर म्हणजेच App चे users वाढल्यावर, servers हि जास्त लागत जातात. हे infrastructure manage करायला engineers लागतात आणि त्यांना खरं तर इथे (म्हणजे अमेरिकेत) “I.T. engineers” म्हणतात. आणि website/app develop करणाऱ्यांना software engineer/developer. असो — तर मूळ मुद्दा असा की infrastructure manage करायला वेळ, कौशल्य आणि पैसे वाढत्या प्रमाणात लागत जातात, म्हणून हेच काम सोपे आणि सुकर होते ते cloud मुळे.
Cloud, विशेषतः cloud computing म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या computers ची सोय तुमचा cloud provider करून देतो. त्यांच्या maintenance ची जबाबदारी, म्हणजे मुखतः एक computer ‘down’ झाला तर त्याच्या जागी तत्पर दुसरा उभा करणे, हि तो घेतो. तुम्ही फक्त तुमचा laptop (किंवा mobile!) वापरून internet वरून तुम्हाला हवी तशी, हवी तितकी आणि हवी तेव्हा computing capacity मागवू शकता. त्या computers वर तुमचे app चालवण्याचे software टाकून तुमचे App लोकांपर्यंत पोचवू शकता. इतकेच नव्हे, तर जगात कोणालाही तुमचे App सुलभतेने वापरता यावे म्हणून विविध देशांत computing ची सोय करू शकता. आणि हे सर्व करणे आज घर बसल्या शक्य आहे — फक्त एक laptop आणि internet वापरून!
Amazon Web Services, Microsoft Azure आणि Google Cloud हे सध्याचे लोकप्रिय असलेले काही cloud providers. ह्या लेखात मी, cloud computing ची हलकीशी ओळख करून दिली, परंतु cloud technology मध्ये big data, serverless इ. असे अनेक पहलु आहेत ज्यांच्यावर आपण पुढील लेखांमध्ये चर्चा करू. पण सध्या cloud computing चा लाभ घेऊन, तुमच्या मनातली एखादी idea घेऊन एखादे नवीन App design करा आणि आम्हाला comments section मध्ये नक्की कळवा. आणि हो, कोणाच्या बोलण्यात “I.T. madhye काम करते” असे आले, तर follow-up प्रश्न मात्र नक्की विचारा !
अस्मिता बर्वे-करंदीकर