Internet Browsing

Asmita BK
Lekhaniya
Published in
3 min readAug 2, 2018

मला पक्कं आठवतंय, मी तिसरीत होते. एका रविवारी, आईने मला, एकटीने जाऊन, रस्ता cross करून काही अंतरावर असलेल्या ‘धर्मेंद्र स्टोअर्स’ मधून थोडं सामान आणण्याची permission दिली (finally!). अमाप उत्साह आणि थोडीशी भीती अश्या मिश्र भावनांनी मी खाली उतरले. ‘धर्मेंद्र स्टोअर्स’ कडे जायचा map एकदा मनात आखला (अर्थात तेव्हा google maps नव्हते). आणि मनातल्या शंका — कुशंका चेहऱ्यावर न दाखवण्याचा प्रयत्न करत confidently चालू पडले ते थेट दुकानाशी येऊन थांबले. मग तिथल्या काकांकडे, खणखणीत आवाजात “अर्धा किलो पोहे, पाव किलो मध्यम रवा आणि bourbon biscuits” मागितली. आणि त्यांच्या “अरे बेबी, आई कुठे ?” ह्या प्रश्नावर, “घरी !” असे आगाऊ पण प्रामाणिक उत्तर देऊन थाटात घरी परतले. घरी सगळ्यांनीच शाबासकी तर दिली पण त्या दिवशी खाल्लेल्या bourbon biscuits ची चवही खास लागली.

तुम्ही तुमच्या internet browser (firefox, chrome, safari ई.) वर एखाद्या website चा address टाकणं म्हणजे आई ने मला bourbon biscuits आणायला सांगण्यासारखे आहे. ह्या उपमेत ‘धर्मेंद्र स्टोअर्स’ म्हणजे, website जिथे hosted आहे तो web server, आणि bourbon biscuits म्हणजे त्या site चे एक web page. तुम्ही जेव्हा browser मध्ये एखाद्या website चे नाव टाकता (www. google.com, www.facebook.com इ.) आणि enter दाबता , तेव्हां अशी काहीशी चक्रे फिरतात:

१. Address Lookup: Browser, प्रथम त्या website चा address शोधतो. Internet मध्ये “address” म्हणजे ती site ज्या web server वर hosted आहे त्या server चा IP Address. internet वर connected अल्सेल्या प्रत्येक device ला एक अद्वितीय (unique) “IP address” असतो ज्याच्यामुळे त्या device पर्यंत पोचता येते. तर हा address browser ला “dns server” कडून मिळतो. DNS Server म्हणजे जणू internet मधल्या addresses चे “google maps”.

२. Send Request: Web server चा address मिळाला की मग browser त्याच्याशी एक connection सुरु करतो. ह्या connection वरून तो server ला “request” पाठवतो. Web server आणि browser ला एकमेकांची भाषा समजावी म्हणून ही request पाठवण्याचा एक protocol असतो आणि तो म्हणजे http (किंवा https). ही request internet वरून web server पर्यंत साता समुद्र पार देखील अतिशय वेगाने पोहचु शकते.

३. Receive Response: Request मिळाली कि web server ती process करतो. आता ह्या processing ला अनेक पेहेलू आहेत. पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर — Web page जर “static” असेल तर web server पटकन फक्त store केलेली webpage ची file शोधतो. पण जर “dynamic” webpage असेल तर मात्रं web server च्या काही विशिष्ट (आणि बरेचदा क्लीष्ट) अश्या प्रक्रिया असतात — जसे database मधून data शोधणं किंवा store करणं, दुसऱ्या server ला request पाठवणं, किंवा आणखी विविध प्रक्रिया सुरु करणं. Dynamic webpage चे उदाहरण म्हणजे तुमची facebook feed, किंवा amazon cart किंवा कोणतीही site जिथे तुम्ही login करता आणि मग तुमच्यासाठी खास असे content तुम्हाला दिसते (जे प्रत्येक user ला वेगळे दिसते). Request process करून झाली कि web server http response परत पाठवतो.

४. Render Webpage: मिळालेल्या http response वर browser ही काही प्रक्रिया करतो आणि website/web page च्या रूपात आपल्याला दाखवण्याचे काम करतो.

हे सर्व क्षणार्धात दृष्टीआड होत असल्याने त्या मागे एवढी process आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. शिवाय मी केलेले वर्णन म्हणजे ह्या technology ची फक्त एक तोंड ओळख समजा — वरील प्रत्येक मुद्द्याला अनेकानेक असे बारीक कंगोरे आहेत ज्यांचा जितका अभ्यास करावा तितका कमीच. पण mobile, ipad, laptop ई. वरून internet browse करणे हे सर्व सामान्य झाल्याने त्या मागे नक्की काय घडते ह्याचे कौतुहल असणे साहजिक आहे. तर ह्या कौतुहलाचे थोडेसे समाधान झाले का, पण त्याचवेळी अजून बरेच काही जाणून घेण्याची चळवळ तुमच्यात सुरु झाली का हे आम्हाला comments मध्ये कळ्वा. Browse करताना website static आहे कि dynamic याचा विचार आला कि bourbon biscuits जरूर खा!

अस्मिता बर्वे-करंदीकर

--

--

Lekhaniya
Lekhaniya

Published in Lekhaniya

A publishing platform for Indian vernacular, for everything write-worthy.

Asmita BK
Asmita BK