रेल्वे तिकीट बुकिंग ऑफर: भारतीय रेल्वे तिकीट आरक्षणावर ५% सूट मिळवा

भारतीय रेल्वेच्या तिकीट आरक्षित तिकीटावर रेल्वेचे तिकीट बुक करणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण भीम किंवा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI वापरून रेल्वेचे तिकीट आरक्षित करू शकतात आणि असे केल्यास आपण रेल्वे तिकिटेवर ५ टक्के सवलत मिळवू शकता. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
“प्रवासी आरक्षण यंत्रणा (पीआरएस) राखीव काउंटर तिकीट मुळ भाड्याच्या एकूण मूल्याच्या ५% सूट प्रती युपीआय / बीएचआयएमला देयक म्हणून पेमेंटचा पर्याय स्वीकारले जाते. उदाहरनार्थ एखादा प्रवासी भीम ऐप वरून ३०० रुपये किमतीचे तिकीट आरक्षित केले तर त्यावर १५ रुपये वाचू शकतात.
दोन्ही अॅप्सने आरक्षित तिकीट केले तर अजून एक फायदा आहे. म्हणजेच एखाद्याने स्लीपर कॅटेगरीत अॅपमधून तिकिटे आरक्षित केली असतील. त्याचवेळी, एसीची जागा रिकामी आहे आणि स्लीपर मधील प्रवासी वाट पाहत आहे. अशावेळी, स्लीपर श्रेणी मधील प्रवासी एसी मध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता त्याच्या स्लीपर श्रेणीतून त्याला एसीमध्ये जाता येईल.
रेल्वेने क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डाचा वापर करून लोकांची सुरक्षितता ठेवण्यासाठी पीओएस मशीन्स आरक्षण केंद्रावर स्थापित केल्या आहेत. प्रवास सुकर व्हावा आणि लोकांचा वेळ वाचवा तसेच व्यवहार कॅशलेस व्हावा म्हणून भारतीय रेल्वे असे विविध उपक्रम राबवत आहे.

